पुणे: पुणे विभाग गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाकडून () पुणे, सोलापूर, सांगली आणि या जिल्ह्यांमध्ये पाच हजार ६४७ सदनिकांसाठी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात झाली असून, एका दिवसात ८१ हजार ४ नागरिकांनी नोंदणी केली आहे. ऑनलाइन लॉटरी जाहीर झाल्यानंतर सदनिकांसाठी निवड झालेल्या नागरिकांच्या कागदपत्रांची छाननी करण्यासाठी ‘म्हाडा’च्या कार्यालयातच शिबिर ठेवण्यात येणार आहे. ( News Update )

वाचा:

‘म्हाडा’चे पुणे विभागाचे मुख्य अधिकारी यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘पुणे विभागातील ही सर्वांत मोठी लॉटरी आहे. ऑनलाइन नोंदणीला सुरुवात झाल्यानंतर एका दिवसात ८१ हजार चार नागरिकांनी नोंदणी केली आहे. आतापर्यंत एक लाख ३४ हजार नागरिकांनी ‘म्हाडा‘च्या संकेतस्थळावर भेट दिली आहे.’

वाचा:

‘बाजारभावापेक्षा सुमारे ३० ते ५० टक्के कमी किमतीत या सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. वन आरके, वन बीएचके आणि टू बीएचके अशा प्रकारच्या या सदनिका आहेत. ऑनलाइन लॉटरी जाहीर झाल्यानंतर सदनिकांसाठी निवड झालेल्या नागरिकांच्या कागदपत्रांची छाननी ही ‘म्हाडा‘च्या कार्यालयात शिबिर आयोजित करून केली जाणार आहे’ असे माने पाटील यांनी स्पष्ट केले.

वाचा:

दरम्यान, पाच हजार ६४७ सदनिकांपैकी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये पाच हजार २१७ सदनिका आहेत. या सदनिकांसाठी अर्जाची ऑनलाइन नोंदणी गुरुवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून सुरू झाली आहे. ११ जानेवारी २०२१ रोजी रात्री बारा वाजेपर्यंत ऑनलाइन नोंदणी सुरू राहणार आहे. https://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. जानेवारी महिन्यात ऑनलाइन पद्धतीने सोडत काढण्यात येणार आहे. , प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य, ‘म्हाडा’कडून बांधण्यात आलेले प्रकल्प आणि २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत या सदनिका स्वस्त दरात नागरिकांना उपलब्ध होणार आहेत.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here