वॉशिंग्टन: करोनाने (Coronavaccine) बुधवारी विक्रमी ३,२६३ रुग्णांचा बळी घेतल्यानंतर अमेरिकेचे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. आणीबाणीची परिस्थिती लक्षात घेता फायझर आणि बायोएनटेकच्या लशीच्या () आणीबाणीच्या काळातील वापरासाठी हिरवा झेंडा दाखण्यात आला आहे. या लसीवर अमेरिकेत मोठी चर्चा सुरू झाली आहे. अमेरिकेतील प्रसारमाध्यमांमध्ये देखील लशीवर जोरदार चर्चा सुरू आहे. या परिस्थितीत लशीवर अनेकदा भाष्य करणारे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष (Donald Trump) यांनी लस निर्मितीबाबत श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे. (donald trump must get the credit for the vaccines and it is a miracle says )

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत निर्मितीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी अमेरिकेतील एका सुप्रसिद्ध टीव्ही शोच्या प्रोडक्शन टीमला उद्देशून हे ट्विट केले आहे. अमेरिकेतील लस निर्मिती हा एक चमत्कार असून याचे श्रेय डोनाल्ड ट्रम्प यांना मिळालेच पाहिजे असे ट्विट ट्रम्प यांनी केले आहे.

फायझर या कंपनीने लस निर्मितीत आघाडी मिळवलेली आहे. फायझरची लस ही ९५ टक्क्यांहूनही अधिक प्रभावी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या बरोबरच १७ डिसेंबरला मॉडर्ना आणि नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ हेल्थच्या लशीला मंजुरी देण्यासाठी देखील एक बैठक आयोजित केली जाणार आहे. मॉडर्नाची करोना लस करोनावर अतिशय प्रभावी असल्याचा दावा मॉडर्नाने देखील केला आहे. सुरुवातीला मर्यादित संख्येत या लशीची निर्मिती केली जाणार आहे. प्राथमिकतेनुसार, या लशीचा डोस सर्वात प्रथम आरोग्य कर्मचारी, लष्कर आणि पोलिस कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे.

प्रक्रिया नियोजनाप्रमाणे चालली आणि मंजुरी मिळाली तर लस २१ डिसेंबरपर्यंच बाजारात येऊ शकते, असे मॉडर्नाचे सीईओ स्टीफन बँसेल यांनी म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा-
दरम्यान अमेरिकेत करोनाने आतापर्यंत २९९,६९२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी या महासाथीने अमेरिकेत विक्रमी ३,२६३ लोकांचा बळी घेतला आहे. या पूर्वी अमेरिकेत १५ एप्रिलला एका दिवसात २,७५२ रुग्णांचा मृत्यू झाला होता. गुरुवारी देखील एकूण २,९०० रुग्णांचा मृत्यू झाला.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here