कोलकाता: गुरुवारी भाजप अध्यक्ष (JP Nadda) यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्यानंतर कोलकाता ते दिल्ली असा राजकीय पारा वर चढला आहे. या घटनेबाबत () यांनी आपला अहवाल गृह मंत्रालयाला पाठवला आहे. आपण कोणत्या एका पक्षाची बाजू घेत नसून घटनेच्या चौकटीत राहूनच आपले कर्तव्य बजावत असल्याचे राज्यपाल धनखड म्हणाले. )i can not live as a while is on target)

घटनात्मक मोडतोड आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याबाबतच्या चर्चेवर बोलताना राज्यपाल धडखड म्हणाले की, याबाबत आपण कोणतेही भाष्य करणार नाही, मात्र काल जे काही झाले ती एक चिंताजनक अशी स्थिती होती. ती एक लोकशाही व्यवस्थेला धक्का पोहचविणारी घटना होती. तुम्ही यावर विश्वास ठेवणार नाही, सकाळी जेव्हा मला भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या दौऱ्याबाबत माहीत पडले तेव्हा मी राज्याच्या डीजीपींना सकाळी ८ वाजता सावध केले होते. याव्यतिरिक्त मी राज्याच्या मुख्य सचिवांशी देखील संपर्क साधला, असे राज्यपाल आज तक या वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले.

मी सर्वांना सकाळी ८ वाजताच्या कार्यक्रमाची माहिती दिली होती. मला १९ मिनिटांनंतर ८ वाजून १९ मिनिटांनी मुख्य सचिवांचा निरोप मिळाला. मी डीजीपींना माहिती दिल्याचे त्यांनी म्हटले होते. यानंतर अर्ध्या तासाने हिंसक घटना घडल्याचे कळले, असे राज्यपाल म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-

यावेळी राज्यपालांनी राज्य प्रशानाकडे बोट दाखवले. राज्याच्या प्रशासनाने व्यवस्थित काम केले नाही, असे ते म्हणाले. राज्यपाल पुढे म्हणाले की, मी डीजीपी आणि मुख्य सचिवांना तुम्ही त्यांना काय सुरक्षा प्रदान केली, तुम्ही त्यांना एकट्यांना सोडून दिले, असे म्हटले. यांना राज्यघटनेचे पालन करावेच लागेल. जेव्हा त्या राज्यघटनेचे पालन करत नाहीत तेव्हा मला यात पडावे लागते. लोकशाही निशाण्यावर असताना मी राजभवनात रबर स्टँप बनून राहू शकणार नाही, असे राज्यपाल म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here