मुंबई: महाराष्ट्रातील बदलत्या राजकारणाचा अंदाज घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही बदलण्याची तयारी केली आहे. त्याची सुरुवात आज पक्षाचा झेंडा बदलण्यापासून झाली. मुंबईत सुरू असलेल्या मनसेच्या राज्यव्यापी अधिवेशनात पक्षाचे अध्यक्ष यांनी भगव्या रंगातील नव्या झेंड्याचं अनावरण केलं. नवा ध्वज समोर येताच उपस्थित कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे निमित्त साधून मनसेनं गोरेगावमधील नेस्को संकुलात महाअधिवेशनाचं आयोजन केलं आहे. नव्या झेंड्याचं अनावरण करून आज अधिवेशनाचा शुभारंभ करण्यात आला. मनसेचा हा ध्वज भगव्या रंगाचा आहे. त्यावर शिवमुद्रा आहे. त्याखाली ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ असं नाव आहे.

वाचा:

मनसेच्या स्थापनेच्या वेळी राज ठाकरे यांनी सर्वसमावेशक भूमिका घेताना झेंड्यामध्ये विविध रंग ठेवले होते. त्यात निळ्या, हिरव्या, भगव्या व पांढऱ्या रंगाचा समावेश होता. कालांतरानं मनसेनं सर्वसमावेशक भूमिकेत बदल करत मराठीचा मुद्दा हाती घेतला होता. मात्र, झेंड्याचा रंग कायम होता. आता मात्र मनसेनं पूर्णपणे नव्या रूपात लोकांसमोर जाण्याचं ठरवलं आहे. त्याची सुरुवात झेंड्यापासून झाली आहे. त्यामुळं आता रंगाबरोबर हिंदुत्वाची भूमिका घेणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. राज ठाकरे हे आज संध्याकाळी अधिवेशनाचा समारोप करताना पक्षाची भूमिका मांडणार आहेत. त्यातूनच पुढील चित्र स्पष्ट होणार आहे.

मराठी व हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राजकारण करणाऱ्या शिवसेनेनं काँग्रेस व राष्ट्रवादीचा हात धरल्यामुळं राज्यातील राजकीय समीकरणं सध्या बदलली आहेत. काँग्रेससोबत सत्तेत असल्यामुळं हिंदुत्व व मराठीची भूमिका घेताना शिवसेनेची मोठी कोंडी होणार आहे. हेच लक्षात घेऊन मनसे मराठीबरोबर हिंदुत्वाची कास धरेल, असं बोललं जात आहे.

वाचा:

  1. मनसेचा झेंडा आधी कसा होता?मनसेचा झेंडा आधी सर्वसमावेशक होता. सर्व जाती-धर्माचे प्रतिनिधीत्व करणारे रंग त्यात होते.
  2. मनसेच्या जुन्या झेंड्यात किती रंग होते?मनसेच्या जुन्या झेंड्यात भगवा, पांढरा, निळा आणि हिरवा असे चार रंग होते.
  3. मनसेच्या नव्या झेंड्यावर काय लिहिण्यात आलं आहे?मनसेच्या नव्या झेंड्यावर शिवमुद्रा कोरण्यात आली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here