मुंबई: ‘महाराष्ट्रातील काँगेस पक्षात मागच्या ७० वर्षांत खूप मोठे नेते निर्माण झाले, पण यशवंतराव चव्हाणांच्या उंचीचा नेता निर्माण झाला नाही. आजही लोक यशवंतरावांचेच स्मरण करतात. चव्हाणांनीच पवारांना घडवले. चव्हाणांनंतर त्यांच्याच तोलामोलाचा नेता म्हणून पवारांकडे पाहायला हवे. देशाचे पंतप्रधान होण्याची क्षमता असलेले पवार हे आज विरोधी पक्षातले एकमेव सर्वात शक्तिमान नेते आहेत,’ असा दावा शिवसेनेनं केला आहे. ( wishes on his Birthday)

वाचा:

शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त ‘सामना’त खास अग्रलेख लिहून शिवसेनेनं त्यांचं कौतुक केलं आहे. पवारांच्या नेतृत्वाची तुलना यांच्या नेतृत्वाशी करण्यात आली आहे. ‘यशवंतरावांकडे ‘धाडस’ सोडले तर सर्व गुण होते. पवारांच्या राजकीय प्रवासात धाडसाची मात्रा अनेकदा जास्तच झालेली दिसते. यशवंतरावांप्रमाणेच माणसे जमवण्याचा व सांभाळण्याचा छंद पवारांना आहे. त्या छंदास कोणी बेरजेचे राजकारण म्हणत असतील तर पवार अनेक वर्षे ही बेरीज करीत आहेत. राज्यातील ‘ठाकरे सरकार’ ही पवारांची अलीकडच्या काळातील सगळ्यात मोठी बेरीज आहे,’ असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

वाचा:

‘पवार ८० वर्षांचे होत आहेत, त्याचवेळी मोदींचे प्रचंड बहुमत असूनही लोकांच्या मनात अशांतता आहे. शेतकरी, कष्टकरी दिल्लीस वेढा घालून पंधरा दिवसांपासून बसला आहे. काँग्रेस पक्षाचे अस्तित्व कमजोर झाले आहे. लोकांना आकर्षित करील असे नेतृत्व आता उरलेले नाही. अशा वेळी महाराष्ट्रात भाजपचा उधळलेला घोडा रोखून शिवसेना, काँग्रेसबरोबर महाविकास आघाडीची स्थापना करणारे, त्या सरकारचे नेतृत्व एका समझदारीने यांच्याकडे सोपविणारे देशातील मोठ्या वर्गास आकर्षित करीत आहेत,’ असंही शिवसेनेनं म्हटलं आहे. ‘८० वर्षांचे होऊनही पवारांचे वय वाढलेच नाही असा त्यांचा उत्साह आजही दिसतोय. ‘कोणत्याही सत्तेच्या पदावर नसलेला लोकप्रिय नेता’, असं शिवसेनेनं त्यांचं वर्णन केलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here