‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले की, टेक्सासकडे जॉर्जिया, मिशिगन, पेन्सिल्वेनिया आणि विस्कॉन्सिनविरोधात खटला दाखल करण्याचा कोणताही ठोस आधार नाही. मंगळवारी टेक्सासचे रिपब्लिकन अॅटर्नी जनरल आणि ट्रम्प यांच्या सहकाऱ्याकडून मंगळवारी खटला दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी राष्ट्राध्यक्षांनी बुधवारी हस्तक्षेप करण्याचा एक प्रस्ताव दाखल केला. न्या. सॅम्युअल अलिटो आणि न्या. क्लेरेंस थॉमस यांनी सांगितले की, टेक्सासवर खटला चालवण्याची परवानगी होती. मात्र, चार राज्यांना आपला अंतिम निवडणूक निकाल जाहीर करण्यास थांबवण्यात आले नाही.
वाचा:
या प्रकरणी व्हाइट हाउसच्यावतीने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली नाही. नियोजित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, ट्रम्प यांचे आरोप तथ्यहीन होते. त्यामुळे या निकालात काहीच आश्चर्यजनक नाही.
वाचा:
डेमोक्रॅटीकच्या पेन्सिल्वेनिया येथील अॅटर्नी जनरल जोश शापिरो यांनी म्हटले की, ट्रम्प यांनी सातत्याने आपण विजयी झाल्याचा खोटा दावा केला. या निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचे निराधार आरोप लावले. निवडणूक प्रक्रियेवर संशय निर्माण केला असल्याचे कोर्टाने पाहिले असल्याचे त्यांनी म्हटले.
वाचा:
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पराभवाचा सामना करावा. काही राज्यांमध्ये अतिशय चुरशीची लढत झाली. मात्र, ट्रम्प यांनी आपला पराभव मान्य केला नाही. निवडणूक मतमोजणीत आघाडीवर असताना आपणच विजयी झालो आहोत, त्यामुळे मतमोजणी थांबवावी अशी मागणी ट्रम्प यांनी केली होती. त्याशिवाय पोस्टल मतांमध्ये गैरप्रकार झाला असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला होता.
दरम्यान, अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाचे अंतिम निकाल जाहीर करण्यात आले आहेत. सर्व राज्यांनी आपली अंतिम मतमोजणी जाहीर केली आहे. त्यानुसार आता डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांच्या पारड्यात ३०६ इलेक्टोरल मते मिळाली आहेत. तर, ट्रम्प यांना २३२ मते मिळाली आहेत. राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकण्यासाठी ५३८ पैकी २७० इलेक्टोरल मतांची आवश्यकता असते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times