LIVE अपडेट :
– भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष राकेश टिकैत यांना ‘या आंदोलनात ‘देशद्रोही घटक सहभागी झाले आहेत का?’ असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी, त्यांनी ‘केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी त्यांना पकडायला हवं. जर एखाद्या बंदी घातलेल्या संघटनेचे लोक आमच्यात घुसले असतील तर त्यांना पकडून तुरुंगात टाकायला हवं. आत्तापर्यंत आम्हाला तरी इथे असं कुणीही भेटलेलं नाही. जर सापडलाच तर त्याला पळवून लावू’ असं टिकैत यांनी म्हटलंय.
– हरयाणाचे शेतकरी अजूनही मोठ्या संख्येनं दिल्लीकडे कूच करत आहेत. कुरुक्षेत्र जिल्ह्यात शेतकरी ट्रॅक्टरमध्ये बसून दिल्लीकडे रवाना झालेत. रस्त्यावर ट्रॅक्टरची लांबच लांब रांग दिसून येतेय. हे सर्व जण दिल्लीच्या सिंघु सीमेवर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना समर्थन देण्यासाठी निघाले आहेत.
वाचा : वाचा :
– टोल प्लाझा बंद पाडण्याच्या शेतकरी संघटनांच्या इशाऱ्यानंतर फरीदाबाद पोलीस अलर्टवर आहेत. आंदोलनादरम्यान कायदेव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ न देण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे. यासाठी जवळपास ३५०० पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
– दुसरीकडे हरयाणामध्येही आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सर्व अर्थात पाचही टोल प्लाझावर ३५०० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेत. दंगाविरोधी उपकरणे हे पोलीस सज्ज आहेत.
– हरयाणामध्ये शुक्रवारी रात्री आंदोलकांनी बस्तारा टोल प्लाझ बंद करण्यात आला होता. कृषी कायद्यांचा विरोध करताना अंबालाचा शंभू टोल प्लाझाही बंद करण्यात आला होता. त्यानंतर त्याला टोल फ्री करण्यात आलं.
– उत्तर प्रदेशच्या सर्व टोल प्लाझांना सुरक्षा आणि सतर्कतेचे निर्देश देण्यात आलेत. राज्यातील सर्व १३० टोल प्लाझावर पोलीस तैनात करण्यात आलेत. फायर ब्रिगेड, ११२, गुप्तचर यंत्रणा यांनाही अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
– शेतकरी नेते बलबीर सिंह राजेवाल यांनी १२ डिसेंबर रोजी दिल्ली – जयपूर महामार्ग रोखण्याचा इशारा दिला होता. या दरम्यान जिल्हाधिकारी आणि भाजप नेत्यांच्या घरांसमोरही करणार आहेत.
वाचा : वाचा :
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times