वाचा:
पवारांचं अभिष्टचिंतन करताना चंद्रकांत पाटील यांनी सविस्तर ट्वीट केलं आहे. त्यात ते म्हणतात, ‘राजकारणात मतभेद नेहमीच पाहायला मिळतील, पण मनभेद कधीच नाही. असेच भिन्न विचारसरणीचे, तरीही अनेक राजकारण्यांचे मार्गदर्शक शरदचंद्र पवार यांचा आज वाढदिवस. शरद पवारांना राजकारणाचा तब्बल ५० वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी तीनवेळा पदभार सांभाळला आहे. राज्याच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याचा त्यांचा निर्णय विशेष उल्लेखनीय आहे.’
कृषी कायद्यांना पाठिंब्याचं आवाहन
शरद पवार यांच्या कृषीविषयक अभ्यासाचे व कामाचंही पाटील यांनी कौतुक केलं आहे. देशाचे कृषी मंत्री असताना शेती व दुग्ध उत्पादन क्षेत्रात त्यांनी वाखाणण्याजोगे काम केले. शेतकऱ्यांना सर्व बंधनातून मुक्त करणाऱ्या सर्व गोष्टींना व विधेयकांना त्यांचा पाठिंबा राहिला आहे आणि पुढेही तो मिळेल,’ असं सूचक आवाहन सध्याच्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी केलं आहे.
मुख्यमंत्र्यांना टोला
करोना काळातही वयाची पर्वा न करता, आपल्या मित्र पक्षातील काही नेत्यांना लाजवतील असे दौरे त्यांनी केले, असं म्हणत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्ष टोला हाणला आहे. राजकारणात आपले विचार व आदर्श वेगळे राहतील, मात्र राज्याच्या जनतेच्या हितासाठी आपण सरकारला व सरकारच्या बाहेर देखील मार्गदर्शन करात राहाल. तुमच्या अनुभवाचा फायदा आघाडी सरकारला व्हावा, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Great post thank you. Hello Administ . Cami Halısı ve Cami Halıları Firmasi. cami halısı