अहमदनगर: यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ ज. बोठे याने जामीन अर्जावर सुनावणीच्या वेळी स्वतः न्यायालयात हजर राहावे, असा अर्ज पोलिसांकडून देण्यात आला. बोठे याचा आठवडाभरापेक्षा जास्त काळ शोध घेऊनही तो सापडला नसल्याने हा अर्ज देऊन पोलिसांनी एकप्रकारे माईंड गेम खेळला का? अशी चर्चाही यानिमित्ताने सुरू झाली. तर, दुसरीकडे पोलिसांचे खबरे नेमके गेले कुठे ? असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे. ()

पोलिसांच्या तपासाचा मोठा भार त्यांच्या खबऱ्यांवर असतो. पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडणाऱ्या प्रत्येक हालचालीची खबरबात पोलिसांपर्यंत पोहोचते, असे काही वर्षांपूर्वी सांगितले जाई. त्याच जोरावर पोलीस गुंतागुंतीचे तपासही करीत असत. मात्र, रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बोठे हा गेल्या आठभरापासून पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरला आहे. या निमित्ताने पोलिसांच्या खबऱ्यांचे हे जाळे विस्कळित झाले आहे का ?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. रात्रंदिवस धावपळ करूनही पोलिसांना बोठे याला पकडण्यात यश आले नाही. बोठे याची माहिती मिळाल्यानंतर तेथे पोलीस जातात, पण प्रत्यक्षात त्यांच्या हाती काहीच लागत नाही. त्यामुळे पोलिसांना मिळणाऱ्या माहितीबाबतही शंका उपस्थित होऊ लागली आहे.

वाचा:

त्यातच बोठे याने नगरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला. या अर्जावर ११ डिसेंबरला सुनावणी ठेवण्यात आली, व या सुनावणीच्या वेळी सरकारी पक्षाला त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगण्यात आले होते. मात्र, सुनावणीच्या वेळी आरोपी बोठे याने स्वतः उपस्थित राहावे, असा अर्जच पोलिसांकडून देण्यात आला, व १४ डिसेंबरला ही सुनावणी गेली. आता १४ डिसेंबरला आरोपी बोठे हा न्यायालयात हजर राहणार किंवा नाही, हे समजलेच. परंतु यानिमित्ताने आठवडाभर शोध घेऊनही बोठे न सापडल्यामुळे पोलिसांना हा माईंड गेम खेळावा लागल्याची चर्चा सुरू झाली आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here