वाचा:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटच्या माध्यमातून पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘पवारांना निरोगी दीर्घायु लाभो’, अशी कामना मोदींनी केली आहे.
मुख्यमंत्री यांनी महाआघाडीचे ‘आधारस्तंभ’ असं संबोधत शुभेच्छा दिल्या आहेत. ‘त्यांची ऊर्जा, उत्साह आम्हा सर्वांना नेहमी प्रेरणा देत राहो,’ अशी सदिच्छा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
वाचा:
उपमुख्यमंत्री यांनी एक खास फोटो ट्वीट केला आहे. ‘हिमालयाएवढ्या उंचीच्या महाराष्ट्राच्या ‘सह्याद्री’ला वाढदिवसाच्या शुभेच्छा, असं अजितदादांनी म्हटलं आहे. ‘साहेबांचं नेतृत्वं, मार्गदर्शन आपल्या सर्वांना कायम मिळत रहावं यासाठी त्यांना निरोगी, दीर्घायुष्य लाभावं,’ अशी प्रार्थना त्यांनी केली आहे.
शिवसेनेचे नेते, खासदार यांनी शरद पवारांना मोजक्या शब्दांत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘साहेब, तुम्ही होता म्हणूनी…’ इतकंच राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. त्यांनी पवारांसोबतचा एक फोटोही ट्वीट केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पुरोगामी विचारांस नमन, असं म्हणत शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘शरद पवार ही केवळ एक व्यक्ती नाही. तो एक विचार आहे, एक विद्यापीठ आहे,’ असं त्यांनी म्हटलं आहे. तर, धनंजय मुंडे यांनी देखील पवारांचं अभिष्टचिंतन केलं आहे.
अन्य मान्यवरांचे ट्वीट
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times