जिल्ह्याला हादरवून टाकणाऱ्या रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ ज. बोठे हा अद्यापही फरार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस त्याच्या मागावर आहेत. मात्र, तो अद्याप सापडलेला नाही. त्यानं अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून त्यावर १४ डिसेंबरला सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

वाचा:

रेखा जरे हत्याकांडातील आतापर्यंतचा घटनाक्रम

३० नोव्हेंबर: रेखा जरे यांची सुपाजवळील जातेगाव घाटात हत्या

२ डिसेंबर: आरोपी फिरोज राजू शेख, ज्ञानेश्वर शिवाजी शिंदे व आदित्य सुधाकर चोळके या तिघांना अटक

३ डिसेंबर: आरोपी सागर भिंगारदिवे, ऋषिकेश पवार या दोघांना अटक

३ डिसेंबर: आरोपींच्या चौकशीतून रेखा जरे यांच्या हत्येची सुपारी पत्रकार बाळ ज. बोठे याने दिली असल्याची पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती.

५ डिसेंबर: आरोपी याच्या बंगल्याची झडती, पिस्तूल जप्त.

७ डिसेंबर: मुख्य साक्षीदार विजयमाला माने यांनी आरोपीकडून जीवाला धोका असल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल करीत पोलीस संरक्षणाची केली मागणी

वाचा:

७ डिसेंबर: अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी आरोपी बाळ बोठे याचा न्यायालयात अर्ज

७ डिसेंबर: आरोपी बाळ बोठे याच्यापासून आमच्या कुटुंबाला धोका असल्याचे रेखा जरे यांच्या मुलाने दिले पोलीस प्रशासनाला निवेदन.

८ डिसेंबर: विजयमाला माने व जरे यांच्या कुटुंबियांना देण्यात आले पोलीस संरक्षण

११ डिसेंबर: आरोपी बोठे याच्या अटकपूर्व जामीनाची सुनावणी १४ डिसेंबरला होणार असल्याचे स्पष्ट. या सुनावणीसाठी बोठे याने स्वतः न्यायालयात हजर रहावे असा पोलिसांनी केला अर्ज.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here