भारतातल्या आकडेवारीवर नजर टाकली तर देशातील एकूण करोना संक्रमितांची संख्या ९८ लाखांच्या पुढे गेलीय. आरोग्य मंत्रालयानं शनिवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील करोना संक्रमितांची संख्या आहे ९८ लाक २६ हजार ७७५. आत्तापर्यंत एकूण ९३ लाख २४ हजार ३२८ रुग्ण करोनातून बाहेर पडले आहे. तर १ लाख २४ हजार ६२८ जणांनी आपले प्राण गमावलेत.
केवळ २४ तासांत (शनिवारी सकाळी ८.०० ते शनिवारी सकाळी ८.०० वाजेपर्यंत) देशात करोनाचे ३० हजार ००६ रुग्ण समोर आले. या २४ तासांत ३३ हजार ४९४ रुग्ण बरे झाले आहेत तर ४४२ जणांनी आपले प्राण गमावले.
वाचा : वाचा :
सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ४ लाखांहून कमी आहे. सध्या देशात ३ लाख ५९ हजार ८१९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
देशाच्या वाढून ९४.८८ टक्क्यांवर पोहचलेला दिसतोय. हा आत्तापर्यंत सर्वाधिक आकडा आहे. २.८१ टक्के तर डेथ रेट १.४५ टक्के आहे.
रिकव्हरी रेट – ९४.८८ पॉझिटिव्हिटी रेट – २.८१ टक्केडेथ रेट १.४५ – टक्के
११ डिसेंबर रोजी एकूण १० लाख ६५ हजार १७६ नमुन्यांची करोना चाचणी करण्यात आली. आत्तापर्यंत देशात एकूण १५ कोटी २६ लाख ९७ हजार ३९९ नमुन्यांची चाचणी करण्यात आलीय.
वाचा : वाचा :
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times