म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचे पाईक असाल, तर संस्था जिवंत ठेवण्याची तुमची जबाबदारी आहे,’ असे नमूद करत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ‘सारथी जिवंत ठेवण्याबाबत मुख्यमंत्री आणि शरद पवार यांची भेट घेऊन शेवटची विनंती करणार आहे,’ असा इशाराही त्यांनी दिला.

वाचा:

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेतर्फे (सारथी) स्थगित करण्यात आलेल्या तारादूत प्रकल्प पुन्हा सुरू करावा, या मागणीसाठी गेल्या सहा दिवसांपासून तारादूत बेमुदत ठिय्या आंदोलन करत आहेत. संभाजीराजेंनी आंदोलक तारादूतांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

वाचा:

‘सारथी संस्थेला स्वायत्तता देणार असा शब्द मुख्यमंत्र्यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून दिला. त्यानंतर दोन महिन्यांपूर्वी अजित पवार यांच्या विभागाने सारथी संस्थेला स्वायत्तता प्रदान केली. मात्र ‘सारथी’चे अधिकारी कलम २५ च्या माध्यमातून आम्हाला स्वायत्तता असल्याचे सांगत आहेत. मग कसली स्वायत्तता,’ असा सवाल करत आंदोलनकर्त्यांसाठी रस्त्यावर पुन्हा उभे राहावे लागेल, असा इशाराही संभाजीराजे यांनी दिला.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here