मुंबई- केंद्र सरकारच्या वादग्रस्त कृषी कायद्याबाबत शेतकऱ्यांचं आंदोलन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून क्रिकेटपटू युवराज सिंग याचे वडील योगराज सिंग हेही समोर आले आहेत. योगराज यांनी या आंदोलनाशी निगडीत काही वादग्रस्त वक्तव्य केली. त्यानंतर त्यांना एका सिनेमातून काढून टाकण्यात आलं आहे.

विवेक अग्निहोत्री एक चित्रपट बनवत होते

सिनेदिग्दर्शत विवेक रंजन अग्निहोत्री आपल्या आगामी ‘द काश्मीर फाइल्स’ या सिनेमाची तयारी करत आहेत. यात योगराज सिंग यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. मात्र अलीकडेच शेतकरी आंदोलनाशी निगडीत एक विधान योगराज यांनी केलं. यानंतर विवेक यांनी त्यांना आपल्या या सिनेमात न घेण्याचा निर्णय घेतला. योगराज सिंग त्यांना करार संपवल्याचं पत्र विवेक यांनी पाठवल्याचंही सांगितलं.

यापूर्वीही केली आहेत अनेक वादग्रस्त विधानं
दरम्यान, यापूर्वीही योगराज सिंग यांनी अनेक वादग्रस्त विधानं केली आहेत. एकदा त्यांनी माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनीवरही वादग्रस्त टीका केली होती. योगराज सिंग यांनी ‘भाग मिल्खा भाग’ सिनेमात फरहान अख्तर याच्या प्रशिक्षकाची भूमिका साकारली होती.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here