असं म्हटलं जात आहे की, आर्याच्या घरकामाला येणाऱ्या बाईने आर्याला दार उघडण्यासाठी अनेक फोन केले. पण तिने फोनला कोणतंच उत्तर दिलं नाही. यानंतर घरकाम करणारी बाई पोलीस ठाण्यात गेली आणि घडलेल्या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच काहीवेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
आर्या बॅनर्जीचा फ्लॅट आतून बंद होता. पोलिसांनी दार तोडून आत प्रवेश केला. यावेळी पोलिसांना बेडरूममध्ये आर्या मृतावस्थेत सापडली. तिच्या नाकातून रक्त वाहत होतं आणि तिने उलट्याही केल्या होत्या.
आर्या बॅनर्जीचं मूळ नाव देवदत्ता बॅनर्जी होते. प्रसिद्ध सितार पंडित निखिल बॅनर्जी यांची ती सर्वात लहान मुलगी होती. ‘लव्ह सेक्स और धोखा’ या सिनेमातून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. यानंतर ती विद्या बालनच्या ‘द डर्टी पिक्चर’ सिनेमातही दिसली होती.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times