राज्यात करोनाचा प्रादुर्भाव आता अटोक्यात येत असला तरी करोनाच्या दिवसभरातील आकेडवारीत मोठे बदल होत असताना दिसत आहेत. आज पुन्हा एकदा करोनामुक्त रुग्णांच्या तुलनेत करोना बाधितांचा आकडा वाढला आहे. दिवसभरात ४ हजार २५९ करोना बाधित रुग्ण सापडले आहेत. तर, ३ हजार ९४९ रुग्णांनी करोनावर मात करुन घरी परतले आहेत. त्यामुळं आतापर्यंत १७ लाख ५३ हजार ९२२ रुग्णांनी करोनाची लढाई यशस्विरित्या जिंकली आहे. त्यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ९३. ४६ टक्के इतका झाला आहे.
आज राज्यात ८० करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं राज्यातील करोना मृतांची एकूण संख्या ४८ हजार १३९ इतकी झाली असून राज्यातील मृत्यूदर २. ५७ टक्के इतका झाला आहे. राज्यात आतापर्यंत करोनाच्या १ कोटी १६ लाख ३८ हजार ३३६ चाचण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यातील १८ लाख ७६ हजार ६९९ (१६.१३ टक्के) चाचण्यांचे अहवाल करोनासाठी पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या ५ लाख २५ हजार ६२३ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर ४ हजार ५०० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times