कंगनाने विचारलं दिलजीत कित्थे आ..
कंगनाने लिहिले की, हैदराबादमध्ये १२ तासांची शिफ्ट संपल्यानंतर आज संध्याकाळी मी चैन्नईमध्ये एका चॅरिटी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेली होती. मी पिवळ्या रंगात कशी दिसत आहे? यासोबतच दिलजीत कित्थे आ ? प्रत्येकजण त्याला ट्विटरवर शोधत आहे.
कंगनाने स्वत: ला म्हटलं, सर्वांची आई
दुसर्या ट्विटमध्ये तिने लिहिले की, मी पुन्हा सांगत आहे की मी बरोबर आहे, जर हे प्रकरण न्यायालयात गेलं असतं तर मी जिंकले असते. म्हणून चिल्लर पार्टी पुढच्यावेळी मला त्रास देण्यापूर्वी, शिवीगाळ करण्यापूर्वी आणि माझी थट्टा उडवण्यापूर्वी हे लक्षात ठेवा की मी तुम्हा सर्वांची आई आहे. #दिलजीत_कित्थे_आ
दिलजीतने दिलं मजेदार उत्तर
कंगनाच्या ट्वीटनंतर प्रत्येकजण दिलजीतच्या उत्तराची वाट पाहत होता. त्याने उशीराने उत्तर दिलं. पण असं काही उत्तर दिलं की कंगना गप्प झाली. दिलजीतने लिहिले की, सकाळी उठून व्यायाम केला.. मग दिवसभर काम केलं, आता मी झोपायला जात आहे, हे घे माझं वेळापत्रक वाच. हॅशटॅग देताना त्याने लिहिले की, #माझं_वेळापत्रक.. ये.. ये..
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times