नवी दिल्लीः राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) प्रमुख ( ) यांच्या प्रकृतीविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्यावर डॉ. उमेश प्रसाद हे उपचार करत आहेत. लालू प्रसाद यादव मूत्रपिंड काम (किडनी ) करणं कधीही थांबू. त्याचा अंदाज करणं कठीण आहे, असं लालू प्रसाद यादव यांच्यावर उपाचर करणारे डॉक्टर उमेश प्रसाद यांनी सांगितलं.

लालू यादव यांची किडनी फक्त २५ टक्केच काम करत आहे. त्यांची किडनी काम करणं कधीही थांबवू शकते. यासंदर्भात उच्च अधिकाऱ्यांना लेखी स्वरुपात कळवलं आहे. लालू प्रसाद यादव यांची प्रकृती नाजूक बनली आहे, असं डॉक्टर उमेश प्रसाद यांनी सांगितलं. लालू प्रसाद यादव हे रांचीच्या राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये दाखल आहेत आणि डॉ. उमेश प्रसाद त्यांच्यावर उपचार करत आहेत.

लालू प्रसाद यादव यांना गेल्या महिन्यात इन्स्टिट्यूटच्या खासगी वॉर्डमध्ये हलवण्यात आलं होतं. बिहार निवडणूक निकालानंतर लालू प्रसाद यादव हे भाजप आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न करत होते. या प्रकरणी एक ऑडिओही समोर आला होता, असा आरोप भाजपने केला होता. मात्र, आरजेडीने हे आरोप फेटाळून लावले. यानंतर लालू यादव यांना पुन्हा रुग्णालयात नेण्यात आले.

लालू प्रसाद यादव यांच्यावर हॉस्पिटलच्या बंगल्यात उपचार सुरू होते. पण लालू यादव हे तुरूंगात शिक्षा भोगत नसून बंगल्यात आरामदायी जीवन जगत आहेत, असा आरोप भाजपने केला होता. त्यानंतर त्यांना बंगल्यातून हलवून हॉस्पिटलच्या वॉर्डमध्ये दाखल केलं गेलं.

लालू प्रसाद यादव यांना तुरुंगातून बाहेर येण्यासाठी आणखी वाट पहावी लागणार आहे. झारखंड हायकोर्टात चारा घोटाळा प्रकरणी सुनावणी झाली. यात लालूंच्या वकिलांनी न्यायालयाकडून ६ आठवड्यांची मुदत मागितली आहे. कोर्टाने त्यांना मंजुरी दिली आहे. म्हणजेच लालू यादव यांच्या जामिनावर आता ६ आठवड्यांनंतरच सुनावणी होईल.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here