मनसेच्या महाअधिवेशनात अमित ठाकरे यांचं लाँचिंग होणार असल्याची जोरदार चर्चा आधीपासूनच होती. अपेक्षेनुसार आज तशी घोषणा झाली. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी अमित यांची मनसेच्या नेतेपदी निवड झाल्याची घोषणा केली. त्यानंतर युवा नेत्यांसमवेत व्यासपीठावर आलेल्या अमित यांनी तलवार उंचावून उपस्थितांना अभिवादन केलं. शर्मिला ठाकरे, बहीण उर्वशी व पत्नी मिताली या तिघीही हे संपूर्ण दृश्य पाहत होत्या. त्या तिघींना आपले आनंदाश्रू आवरता आले नाहीत.
वाचा:
अमित यांच्यावर आलेल्या नव्या जबाबदारीबद्दल बोलताना शर्मिला भावूक झाल्या. ‘आई म्हणून माझा आशीर्वाद आणि शुभेच्छा अमितच्या सोबत कायम आहेत. आजच्या क्षणाची आम्ही सगळेच वाट पाहत होतो. आम्ही हे सगळं केवळ मीडियातच ऐकत होतो. कारण आम्हाला कुणीही याबद्दल आधी कल्पना दिली नव्हती. त्यामुळं प्रत्यक्षात हा क्षण पाहून माझ्या अंगावर काटा आला. मन भरून आलं,’ असं शर्मिला म्हणाल्या. ‘अमितची कुणाशीही तुलना करण्याची गरज नाही. त्यानं समाजासाठी चांगलं काम करणं जास्त महत्त्वाचं आहे,’ असं शर्मिला म्हणाल्या.
वाचा:
वाचा:
पत्नीच्या डोळ्यात पाणी
अमित ठाकरे यांच्या पत्नी मिताली यांनीही पत्रकारांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘हा प्रसंग पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं. खूप बरं वाटलं. त्यांच्या पुढील वाटचालीत माझा त्यांना पूर्ण पाठिंबा राहील,’ असं मिताली म्हणाल्या.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times