टॉप समुहाला सुरक्षा रक्षकांचे कंत्राट देताना त्यातून मोठ्या प्रमाणात दलाली घेणे तसेच या समुहांतर्गत परदेशी रकमेचा गैरव्यवहार करणे व परदेशात बेकायदेशीर मालमत्ता खरेदी करणे, या संशयावरुन सक्तवसुली संचालनालयाकडून आमदार सरनाईक व त्यांचा मुलगा विहंग यांचा तपास होत आहे. या प्रकरणी ईडीनं प्रताप सरनाईक यांना समन्स बजावले असल्याची चर्चा असतानाच सरनाईक यांनी हे आरोप खोटे असल्याचा दावा केला आहे.
‘पाकिस्तानचा आणि माझा काहीही संबंध नाही. देशाच्या विरोधात कारवाई करणाऱ्या पाकिस्तानविरोधात आयुष्यभर मी लढलो. त्यामुळं माझा आणि पाकिस्तानचा काय संबंध असणार,’ असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. शिवाय, अशा प्रकारे खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांविरोधात कारवाई करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
‘चौकशीला हजर राहण्यासंदर्भात समन्स बजावण्यात आलेला नाही. ज्यावेळी आधी समन्स बजावला होता तेव्हा मी स्वतः चौकशीला सामोरा गेलो होतो. ईडीसारख्या संस्थेला सहकार्य करणं मी माझं कर्तव्य समजतो. परत कधी बोलावलं नाही,’ असंही प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times