वाचा-
डे-नाइट सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऋषभ पंतने धमाकेदार शतक केले. त्याने ७३ चेंडूत ६ षटकार आणि ९ चौकारांसह शतक पूर्ण केले. दुसऱ्या दिवसाच्या अखेरच्या षटकात त्याने २२ धावा केल्या आणि शतक झळकावले. गेल्या महिन्यांपासून पंतवर चांगली कामगिरी करण्याचा दबाव होता. त्यावरून त्याच्यावर अनेकदा टीका देखील झाली होती. इतक नव्हे तर पंतला संघाबाहेर किंवा अंतिम ११ मध्ये स्थान मिळाले नव्हते.
वाचा-
वाचा-
पंतने दुसऱ्या दिवशी आक्रमक फलंदाजी केली. अखेरच्या षटकात त्याने चार चौकार आणि एक षटकार मारत २२ धावा केल्या. शेवटच्या चेंडूवर चौकार मारत त्याने शतक पूर्ण केले. ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी झालेल्या आयपीएलमध्ये पंतची कामगिरी अपेक्षेनुसार झाली नव्हती. त्यामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-२० आणि वनडे मालिकेत त्याला संधीच मिळाली नाही. पहिल्या कसोटीसाठी वृद्धीमान साहा हीच संघ व्यवस्थापनाची पहिली निवड होती. पण त्याआधी शतक करून पंतने संघ व्यवस्थापनासमोर गोंधळाची परिस्थिती निर्माण केली आहे.
वाचा-
वाचा-
आता कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यातून काय मार्ग काढतात हे पाहावे लागले. विकेटकिपिंगच्या बाबत पंत हा साहाच्या मागे नाही. त्यामुळे पंतला कसोटीत विकेटकिपर म्हणून चांगली कामगिरी करावी लागले. आता पहिल्या कसोटीत विकेटकिपर म्हणून कोणाला संधी मिळते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times