शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा कार्यक्रम संपल्यानंतर संध्याकाळी शरद पवार यांनी कुटुंबीयांसोबत वाढदिवस साजरा केला. यावेळी पवारांचे औक्षणदेखील करण्यात आले.
शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार तसंच, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यासह कुटुंबातील अन्य व्यक्तीही उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.
दरम्यान, पवारांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘सार्वजनिक जीवनात काम करत असताना समाजातील शेवटच्या माणसाच्या हिताची जपणूक करण्याचे काम मी मागील ५०-५५ वर्षे करतोय. हे काम करण्याची संधी मला महाराष्ट्राच्या जनतेने दिली. माझ्या कुटुंबाची आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांची साथ त्याला लाभली, याबद्दल मी कृतज्ञ आहे,’ अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज व्यक्त केल्या.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times