सिहोर: भाजप खासदार ( ) या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असतात. आता त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कॉंग्रेस आणि डावे पक्ष शेतकऱ्यांच्या वेशभूषेत लपून कृषी कायद्यांविरोधात ( ) आंदोलनाला ( ) बसले आहेत. या देशविरोधी शक्ती शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत, असं म्हणत शेतकरी आंदोलनवरून प्रज्ञासिंह
ठाकूर यांनी शाहीनबाग आंदोलनाचा उल्लेख केला.

शाहीनबागमध्ये ज्या प्रकारे जेएनयूतील काही लोक, चित्रपट क्षेत्रातील काही डाव्या विचारांचे कलाकार सहभागी होते. तेच चेहरे आता पुढे येत आहेत. असे लोक देशाचं नुकसान करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना तुरुंगात टाकलेलंच योग्य होईल. पंजाबमधील कॉंग्रेस सरकारने हे नवीन कृषी कायदे लागू केलेला नाही. तरीही पंजाबमधील लोक इथं येऊन आंदोलन का करत आहेत? असा सवाल प्रज्ञासिंह यांनी उपस्थित केला. केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यात कुठल्याही सुधारणांची गरज नाही. सर्व सुधारणा करून हे कायदे आणले गेले आहेत, असं म्हणत प्रज्ञासिंह यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.

देशविरोधी कारवाया करणाऱ्यांविरोधात लोकसंख्या नियंत्रण कायदा असायला हवा. पण जे राष्ट्रधर्मासाठी कार्य करतात त्यांच्यावर या बंधन आणू नये, प्रज्ञासिंह म्हणाल्या. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी नाव न घेता मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंग यांना लक्ष्य केलं. जे देशाचा अपमान करतात आणि भगवाधारींना दहशतवादी ठरवतात ते क्षत्रिय नाहीत. हे लोक भगवा आणि हिंदुत्वाचा अपमान करतात, अशांना राजे म्हणू नये, असा टोला प्रज्ञासिंह यांनी लगावला.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा तीळपापड झाल्या आहे. हा भारत आहे, पाकिस्तान नाही, त्यांना समजलंय. हे बंगालमध्ये भाजप आणि हिंदूंचे राज्य येईल. बंगाल हा अखंड भारताचा एक भाग आहे. हिंदु राष्ट्राची स्थापना होईल. बंगाल आपले हिंदू राज्य होईल. भारत एक हिंदू राष्ट्र होईल, असं प्रज्ञासिंह ठाकूर म्हणाल्या.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here