नवी दिल्लीः कृषी कायद्यांविरोधात ( ) शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनामुळे ( ) गेल्या १२ दिवसांपासून बंद असलेली दिल्ली-नोएडा चिल्ला सीमा ( ) आता उघडण्यात आली आहे. चिल्ला सीमेवर धरणे आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांनी शनिवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची भेट घेतली. यावेळी मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये चर्चातून सहमती झाली. यानंतर वाहतुकीसाठी मार्ग उघडण्यात आला.

शेतकऱ्यांचे ५ सदस्यांच्या टीमने संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी त्यांच्या निवासस्थानी भेटली. यावेळी झालेल्या बैठकीत कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमरही उपस्थित होते. संरक्षणमंत्र्यांसमोर १८ प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या. यात मुख्य मागणी शेतकरी आयोग स्थापन करण्याची आहे. किमान आधारभूत किंमतीचा (एमएसपी) मागण्यांमध्ये उल्लेख नाही. आमच्या नेत्यांनी संरक्षणमंत्री आणि कृषीमंत्र्यांची भेट घेतली. मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन आम्हाला देण्यात आलं आहे, म्हणून आम्ही मार्ग मोकळा केला आहे, असं एका शेतकऱ्याने सांगितलं.

नोएडाहून दिल्लीला जाणाऱ्या मार्गावरील बॅरिकेड्स रात्री उशिरा हटवण्यात आले. यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरू झाली. चिल्ला सीमा बंद झाल्यामुळे वाहनचालकांना दिल्लीला जाण्यासाठी डीएनडी आणि कालिंदी कुंजमधून जावे लागले.

शेतकरी संघटनेचे नेते उपोषणाला बसणार

आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. १४ तारखेला सोमवारी उपोषणाला बसणार आहोत, असं शेतकरी नेते कमलप्रीत पन्नू यांनी सांगितलं. तर रविवारी हजारो शेतकरी राजस्थान सीमेवरुन ट्रॅक्टर मार्च काढून दिल्ली-जयपूर महामार्ग बंद करतील, असं ते म्हणाले. तर पंजाबमधून येणाऱ्या शेतकऱ्यांना रोखलं जात आहेत. शेतकऱ्यांना दिल्लीपर्यंत पोहोचू द्या. सरकारने १९ डिसेंबरपर्यंत आमच्या मागण्या मान्य न केल्यास आम्ही गुरु तेग बहादूर यांच्या शहीद दिवसापासून आमरण उपोषण सुरू करू, असं शेतकरी नेते गुरनामसिंग चारुनी म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here