किशोर नंदनवार (वय २५, रा. शिवनगर) असे मृतकाचे तर रिजवान खान (वय २५, शिवनगर) , असे अटकेतील मारेकरी भावाचे नाव आहे. किशोर याचा कळमन्यात फळ विक्रीचा व्यवसाय आहे तर, रिजवान हा मंडप डेकोरेशनचे काम करतो.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर याचे गत सहा वर्षांपासून रिजवान याच्या मानलेल्या बहिणीसोबत प्रेमसंबंध होता. याला रिजवान याचा विरोध होता. शुक्रवारी बहिणीशी संबंध तोडण्याच्या कारणावरून रिजवान याने किशोर याच्यासोबत वाद घातला. किशोर याच्या कुटुंबींयानी हे प्रकरण समोपचाराने निपटविले. मात्र रिजवानला किशोर हा खटकत होता.शनिवारी सकाळी प्रकरण कायमचे मिटवायचे असल्याचे सांगून रिजवान याने किशोर याला मांजरी पुलाजवळ बोलाविले. किशोर तेथे आला. ,असे रिजवान त्याला म्हणाला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेला. रिजवान याने चाकूने किशोरच्या पोटावर सपासप वार केले. किशोर याचा मृत्यू झाला. रिजवानने तेथून पळ काढला. माहिती मिळताच यशोधरानगर पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. मारेकरी रेल्वे क्रॉसिंगकडे पळाल्याचे नागरिकांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी पाठलाग करून रिजवान याला अटक केली. त्याच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times