नवी दिल्ली: मलेशियामधील दहशतवादी संघटना () भारतात दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार () भारतात हल्ला करण्यासाठी ही संघटना महिलेचा वापर करण्याची शक्यता आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांना फरार इस्लामिक प्रचारक झाकीर नाईक (Zakir Naik) यांच्या संबंध असलेल्या आर्थिक देवाण-घेवाणीची माहिती मिळाली आहे.

म्यानमारमध्ये प्रशिक्षण दिले गेलेल्या महिलेच्या नेतृत्वाखाली होऊ शकतो दहशतवादी हल्ला

रोहिंग्यांशी संबंधित एक हल्ल्याची तयारी करत असल्याचे गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीच्या आधारे मानले जात आहे. या माहितीनुसार, महिलेच्या नेतृत्वातील एक दहशतवादी संघटना पुढील काही आठवड्यांमध्ये भारतातील शहरांमध्ये हल्ले करू शकतात. या संघटनेला म्यानमारमध्ये प्रशिक्षण देण्यात आले आहे.

झाकीर नाईकशी जुळतायत धागेदोरे, अनेक राज्यांना केले सावध

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी गुप्तचर यंत्रणांनी या संबंधी अनेक राज्यांना सावध केले आहे. दिल्ली, हरयाणा, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालच्या पोलिसांना आणि गुप्तचर यंत्रणांना याची माहिती देण्यात आली आहे. यात २ लाख अमेरिकन डॉलर्सची देवाण-घेवाण झाल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे. या व्यवहाराचा संबंध भारताशी आहे. तसचे याचे धागेदोरे वादग्रस्त इस्लामिक प्रचारक झाकीर नाईक आणि कौलालंपूरचा रोहिंग्या नेता मोहम्मद नसीर यांच्याशी जुळलेले आहेत.

चेन्नईच्या हवाला ऑपरेटरजवळ पोहोचला पैसा
मिळालेल्या माहितीनुसार, या पैशांच्या व्यवहारातील काही भाग एका चैन्नईच्या संशयिताकडे पोहोचलेला आहे. ही व्यक्ती हवाला डीलर असल्याचे मानले जात आहे. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, भारतात हल्ला करण्याच्या तयारीत असलेला दहशतवाद्यांचा हा समूह डिसेंबरच्या मध्यावर किंवा शेवटी बांगलादेशमार्गे भारतात येऊ शकतो.

क्लिक करा आणि वाचा-

पीएफआयचे लोक करू शकतात दहशतवाद्यांची मदत

या हल्ल्याच्या योजनेत सहभागी असलेली महिला नेमकी कोण आहे याबाबत माहिती मिळालेली नाही, मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेला याच वर्षी मलेशियाहून म्यानमारला प्रशिक्षणासाठी पाठवले गेले होते. राज्यांना पाठवण्यात आलेल्या अलर्टमध्ये विशेषत: अयोध्या, बोधगया, पंजाब आणि श्रीनगरचा उल्लेख आहे. पीएफआयी संबंधित काही लोक या दहशतवाी समूहाला मदत करू शकतात, असा गुप्तचर यंत्रणांचा संशय आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here