मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादीचे नेते यांनीही पवारांच्या वाढदिवसानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. मात्र, हा कार्यक्रम संपल्यानंतर स्टेजवर एकच गोंधळ उडाला होता. या घटनेनंतर भाजप नेते यांनी एक व्हिडिओ शेअर करत आयोजकांना टोला लगावला आहे.

धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघात शरद पवारांचा वाढदिवस साजरा केला. या कार्यक्रमासाठी बॉलिवूड अभिनेता गोविंदा यांची प्रमुख उपस्थिती होती. पवारांच्या वाढदिवसासाठी ८१ किलोंचा केकही आणण्यात आला होता. मात्र, हा कार्यक्रम संपताच केक खाण्यासाठी कार्यकर्त्यांची एकच गर्दी झाली होती. स्टेजवर केक खाण्यासाठी झालेली गर्दी पाहून आयोजकांनी धाव घेत गर्दी नियंत्रणात आणली. निलेश राणे यांनी हाच धागा पकडत निशाणा साधला आहे.

निलेश राणेंनी एक ट्विट केलं आहे. मन खचून गेलं हे पाहून… महाराष्ट्रात ६० वर्षामध्ये एक सम्राट होऊन गेले म्हणतात, काहींना स्वतंत्र महाराष्ट्राचे जाणते राजे काही लोकं म्हणतात, त्या ६० वर्षांच्या महाराष्ट्रात ही परिस्थिती बघायला मिळते, असा टोला निलेश राणेंनी लगावला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here