नवी दिल्ली : आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करून भारतीय क्रिकेट संघाचे दार ठोठावणाऱ्या एका खेळाडूने शनिवारी लग्न केले. पण या लग्नात एक अनोखी गोष्ट पाहायला मिळाली. कारण लग्नाच्या स्टेजवरच या क्रिकेटपटूने आपल्या पत्नीला आऊट केल्याचे पाहायला मिळाले. या गोष्टीचा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे.

यावर्षी झालेल्या आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळताना ‘मिस्ट्री स्पिनर’ अशी आपली ओळख निर्माण केली ती वरुण चक्रवर्तीने. शनिवारी वरुण चक्रवर्तीने गर्लफ्रेंड नेहा खेडेकरबरोबर लग्न केले. पण लग्न झाल्यावर एक अनोखा प्रकार पाहायला मिळाला. लग्न झाल्यावर स्टेजवर बॅट आणि बॉल आणले गेले. वरुण हा गोलंदाज आहे त्यामुळे त्याच्या हातात चेंडू देण्यात आला तर नेहाला फलंदाजी करण्यास सांगितले गेले. यावेळी वरुणने आपल्या गोलंदाजीवर नेहाला आऊट केल्याचे पाहायला मिळाले. फक्त एकदाच नाही तर वरुणने दोनवेळा नेहाला आपल्याच गोलंदाजीवर कॅच पकडत बाद केले.

वरुणने आयपीएलमध्ये भेदक गोलंदाजी केली होती. त्यामुळेच वरुणला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघात स्थान मिळाले होते. पण त्यानंतर वरुण दुखापतग्रस्त असल्याचे समजले आणि त्यामुळे वरुणला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाता आले नाही.

करोनामुळे वरुणचे लग्न पुढे ढकलण्यात आले होते. पण अखेर शनिवारी वरुण आणि नेहा यांचे लग्न झाले. कोलकाता नाइट रायडर्सच्या संघाने यावेळी वरुण आणि नेहा यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर वरुण आणि नेहा यांचा व्हिडीओही कोलकाता नाइट रायडर्सने आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे.

वरुण आणि नेहा यांनी चेन्नईमध्ये आपले कुटुंबिय आणि जवळच्या मित्रांच्या साक्षीने लग्न केले. या दोघांच्या लग्नाचे फोटो पहिल्यांदा व्हायरल झाले, त्यानंतर चाहत्यांनी या दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत. त्यानंतर कोलकाता नाइट रायडर्सने एक व्हिडीओ क्लीप सोशल मीडियावर शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये हे दोघेही क्रिकेट खेळताना पाहायला मिळाले आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here