पुणेः करोना काळात मोबाईलवर ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या आठवी इयत्तेतील मुलीला झुम अॅपवर अश्लील मेसेज आले असून, तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या मुलीसंबंधी तिचे वडील आणि मुख्यध्यापकांच्या मेलवर देखील अश्लील मेसेज पाठविण्यात आले आहेत.

मागील काही महिन्यापासून सुरू असलेल्या प्रकरणानंतर मुलीच्या आईने भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थांचे सध्या ऑनलाईन शिक्षण सुरू आहेत. मात्र, अश्याच ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या इयत्ता आठवीतील मुलीला अश्लील मेसेज आले असून जीवे मारण्याची धमकी झूम अॅपवर आली आहे. तसेच अल्पवयीन मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल जात आहे. ही मुलगी ऑनलाइन शिक्षण घेत असताना हा गंभीर प्रकार घडत आहे.

‘माझा माणूस तुझ्याकडे पाठवतो, तू जर आली नाहीस तर जीवे मारेल, अन्यथा तू आत्महत्या कर, असे झूमवर मेसेज संबंधित अल्पवयीन मुलीला केले जात आहेत. या प्रकरणामुळे पालक भीतीच्या सावटाखाली आहेत.

गंभीर बाब म्हणजे, अल्पवयीन मुलीच्या वडिलांच्या आणि ज्या शाळेत मुलगी शिक्षण घेत आहे तेथील मुख्याध्यापक यांच्या मेलवर देखील मुलीसबंधी अश्लील मेसेज पाठविण्यात आले आहेत. याप्रकरणी शाळा प्रशासनाने सर्व पालकांची आणि मुलांची बैठक घेऊन अन्य कोणासंबंधी असकाही घडल्यास तात्काळ पुढे यावे असे आवाहन केले आहे. एमआयडीसी भोसरी पोलिस तपास करीत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here