एमएनएम प्रमुख कमल हासन हे पुढील वर्षी होणाऱ्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी रविवारी आपला निवडणूक प्रचार सुरू करत आहेत. या पूर्वी त्यांनी ट्विट करत उभे राहत असलेल्या नव्या संसद भवाना निर्मितीवर केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला.
निवडणूक प्रचाराची सुरुवात करत आहेत कमल हासन
अभिनेत्याचे नेते बनलेले कमल हासन हे १३-१६ डिसेंबरच्या दरम्यान आपल्या पहिल्या टप्प्यातील निवडणूक अभियानाची सुरुवात करत आहेत. चार दिवसांच्या कार्यक्रमाद्वारे कमल हासन मदुराई, थेणी, डिंडीगूल, विरुद्धुनगर, तिरूनलवेली, तूतिकोरीन आणि कन्याकुमारी जिल्ह्याचे दौरे करणार आहेत. हासन यांच्या पक्षाने गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत आपले उमेदवार उतरवले होते. मात्र त्या निवडणुकीत त्यांना कोणतीही सफलता मिळाली नव्हती.
क्लिक करा आणि वाचा-
८६१.९० कोटी रुपये खर्चून उभे राहत आहे
काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसद भवनाची पायाभरणी केली. ही नवी इमारत उभी करण्यासाठी ८६१.९० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. नवे संसद भवन टाटा प्रोजेक्ट लिमिटेड बनवत आहे. हे बांधकाम सन २०२२ पर्यंत पूर्ण होणार आहे. ही इमारत तीन मजली असेल. या इमारतीचे बांधकाम भूकंपरोधक असेल. नव्या भवनाच्या निर्मितीदरम्यान वायु आणि ध्वनी प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times