सिडनी, : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताचा ०-४ असा लाजीरवाणा पराभव होऊ शकतो, असे मत इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने व्यक्त केले आहे.

वॉनने याबाबत सांगितले की, ” ऑस्ट्रेलियाकडे सध्याच्या घडीला मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्स असे तीन दर्जेदार वेगवान गोलंदाज आहे. ऑस्ट्रेलियामध्ये आतापर्यंत या दोघांनी भेदक गोलंदाजी केली आहे. त्यामुळे भारताला या तिन्ही गोलंदाजांना सांभाळून खेळावे लागेल. त्याचबरोबर भारतीय संघाला कुकाबुरा बॉलने खेळायचे आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी ही कसोटी मालिका सोपी नसेल. जर भारतीय संघाकडून चांगली कामगिरी झाली नाही तर ऑस्ट्रेलियाचा संघ अधिक मजबूत होईल आणि ही मालिका ४-० अशी जिंकू शकतात.”

वॉनने पुढे सांगितले की, ” भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली कसोटी दिवस-रात्र होणार आहे. या सामन्यात गुलाबी चेंडूचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे हा पहिला सामना दोन्ही संघांसाठई महत्वाचा असेल. पहिल्या सामन्यात जर ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला तर त्यांना ही मालिका ४-० अशी जिंकता येऊ शकते. कारण भारताचा कर्णझार विराट कोहली हा फक्त पहिल्याच कसोटी सामन्यात खेळणार आहे, त्यनंतरचे तीन सामने तो खेळू शकणार नाही. त्यामुळे या गोष्टीचा फायदा ऑस्ट्रेलियाला नक्कीच होऊ शकतो.”

भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात तिन्ही मालिका गमवाव्या लागतील, असे मत वॉनने यापूर्वी व्यक्त केले होते. भारताला ऑस्ट्रेलियामध्ये एकदिवसीय मालिका गमवावी लागली होती. पण त्यानंतर भारताने ट्वेन्टी-२० मालिका २-१ अशा फरकाने जिंकली होती. आता कसोटी मालिकेत नेमके काय होते, याची उत्सुकता सर्वांनाच असेल.

कसोटी मालिका
१) पहिली कसोटी- १७ ते २१ डिसेंबर, एडिलेड ओव्हल- डे/नाईट (सकाळी ९ वाजता)
२) दुसरी कसोटी- २६ ते ३० डिसेंबर, मेलबर्न (पहाटे ५ वाजता)
३) तिसरी कसोटी- ७ ते ११ जानेवारी २०२१, सिडनी (पहाटे ५ वाजता)
४) चौथी कसोटी- १५ ते १९ जानेवारी, २०२१, गाबा (पहाटे साडे पाच वाजता)

भारताच्या या दौऱ्यातील सर्व सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण सोनी सिक्स आणि डीडी स्पोट्स वर होणार आहे. या शिवाय Sony LIVवर लाइव्ह स्ट्रीमिंग होईल. कसोटी मालिका फक्त सोनी सिक्स आणि Sony LIV वर दिसेल. या शिवाय भारतीय संघ दोन सराव सामने खेळणार आहे. या सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अॅपवर केले जाणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या लढतीचे LIVE UPDATE आणि स्कोअरकार्ड महाराष्ट्र टाइम्सच्या वेबसाइटवर तुम्ही पाहू शकता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here