ठाणेः मुरबाड मतदारसंघाचे भाजपचे आमदार ( kisan kathore ) यांच्या गाडीला अपघात झाला आहे. कल्याण तालुकातील अनखर पाडा येथील रस्त्याच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम आटोपून बदलापूरकडे येत असताना संध्याकाळी पावणे सातच्या सुमाराला हा अपघात झाला. कथोरे यांच्या गाडीला समोरून येणाऱ्या दुचाकीने धडक दिली. या घत दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर कथोरेंना किरकोळ दुखापत झाली.

रस्त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आटोपून किसन कथोरे हे अनखर पाडा गोवेली वाहोली मार्गे बदलापूरकडे येत होते. यावेळी समोरून येणाऱ्या दुचाकीने त्यांच्या गाडीला धडक दिली. पिकनिकहून येणाऱ्या दुचाकीवरील तरुण तरुणीचा या अपघातात जागीच मृत्यू झाला, अशी प्राथमिक माहिती आहे.

अपघातात दुचाकीवरील दोघे जण जवळपास १० फूट लांब फेकले गेले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तरुणी, तरुणी हे कल्याणच्या नेतीवली परिसरातील राहणारे होते. अमित सिंग आणि सिमरन सिंग अशी त्यांची नवं आहेत. या घटनेत आमदार किसन कथोरे आणि त्यांच्या गाडीचा चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे. तर कथोरे यांचे अंगरक्षक माळी, स्वीय साहाय्यक महेश सावंत हे सुखरूप आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here