म. टा. प्रतिनिधी, नागपूर: कोणत्याही यंत्र किंवा महागड्या साधनाशिवाय साध्या डोळ्यांनी अनुभवता येणारी आकाशातील आतषबाजी म्हणजे ( ). खगोलप्रेमींसाठी ती एक पर्वणीच असते. सोमवार आणि मंगळवारी हा उल्कावर्षाव होईल. मात्र, विदर्भातील आकाशात पसरलेल्या ढगांमुळे हा तो निष्प्रभ ठरणार असल्याची चिंता खलोगप्रेमींना सतावते आहे.

रविवारी मध्यरात्री मिथुन राशीतील पूनर्वसू नक्षत्रात पायथन या होईल. ताशी १०० ते १२० अर्थात दर मिनिटाला दोन उल्का पडताना दिसू शकतात. कधी कधी चंद्रप्रकाशाचा अडथळा असल्याने उल्का दिसण्याचे प्रमाण कमी असते. मात्र, यंदा कार्तिकी पौर्णिमेमुळे उत्तम उल्कावर्षाव अनुभवता येऊ शकतो.

याबाबत रामण विज्ञान केंद्राचे महेंद्र वाघ म्हणाले, ‘सोमवारी आणि मंगळवारी मध्यरात्रीदरम्यान हा उल्कावर्षाव दिसणे अपेक्षित आहे. मिथुन राशीतून होणारा हा जेमिनिड उल्कवर्षाव साध्या डोळ्यांनी अनुभवता येऊ शकतो. पायथन या उल्कापिंडामुळे तो होणार आहे. मात्र, सध्या संपूर्ण विदर्भात ढगाळ वातावरण असल्याने तो अनुभवता येण्याची शक्यता फारच कमी आहे. वर्षातून एकदा सिंह किंवा मिथुन राशीतून हा उल्कावर्षाव होतो. त्यामुळे खगोलप्रेमी त्याची आतुरतेने वाट बघत असतात. परंतु, यंदा ढगाळ वातावरण राहिल्यास त्यांच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे.’

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here