नागपूर: सेक्युरिटी एजन्सीमधील सुरक्षा रक्षकांचे भविष्य निर्वाह निधी व जीएसटी जमा न करता शासनाची ५० लाखांनी फसवणूक केल्याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी लष्कराच्या निवृत्त कर्नलविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. मलकतसिंग करमसिंग (वय ६२, रा.लता अपार्टमेंट, गुरूनानक शाळेजवळ, जरीपटका) ,असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या निवृत्त कर्नलचे नाव आहे. रघुवीर साधू सिंग (वय ६८, रा. नोएडा, उत्तरप्रदेश) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रघुवीर ही आहेत. सोबत सेवा बजावल्याने दोघे एकमेकांना ओेळखतात. २०१७ मध्ये रघुवीर यांनी हेडवे नावाची सेक्युरिटी एजन्सी स्थापन केली. नागपुरातील कारभार मलकितसिंग यांच्याकडे सोपविला. त्यांना कपनीत भागीदारही करून घेतले. बँकेसह शहरातील विविध ठिकाणी मलकितसिंग यांनी ३६ सुरक्षा रक्षक तैनात केले. ऑगस्ट २०१७ ते ऑक्टोबर २०१८ या कालावधीतील सुरक्षा रक्षकांचा भविष्य निर्वाह निधी व जीएसटी जमा केला नाही. याबाबत रघुवीर यांना कळले.त्यांनी दस्तऐवजाची तपासणी केली असता खात्री पटली. रघुवीर यांनी मलकितसिंग यांना विचारणा केली. पैसे जमा करतो, असे त्यांनी सांगितले. मात्र पैसे जमा केले. अखेर रघुवीर यांनी जरीपटका पोलिसांत तक्रार दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक आर.एन.फटांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आर.बी.अंबोरे यांनी तपास करून मलकितसिंग यांच्याविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. मलकितसिंग हे फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here