: लग्नाचे आमिष दाखवून मेव्हणीवर वारंवार बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मेव्हणीने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल बबन भालेराव (वय २९, रा. कोरेगाव भीमा, ता. शिरूर) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मावस मेव्हणीसोबत तिच्या संमतीशिवाय संबंध ठेवले. मेव्हणीला लग्नाचे आमिष दाखविले आणि वेळोवेळी शरीरसंबंध ठेवले. या प्रकरणी पीडितेने ११ ऑगस्टला एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविली.

पुतणीचा विनयभंग

पिंपरी : सुट्टीसाठी आलेल्या पुतणीचा काकाने विनयभंग केला. काकाकडून होणारे गैरकृत्य सहन न झाल्याने पुतणीने राहत्या घराच्या गॅलरीतून उडी घेऊन आत्महत्या केली. एप्रिल २०१८ ते ६ सप्टेंबर २०२० या कालावधीत विनयभंगाचा प्रकार घडला. या प्रकरणी मयत मुलीच्या आईने भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गौरव सोपान नारखेडे (वय ३०, रा. कलावती लॉन्ससमोर औरंगाबाद) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींचे पती वारले आहेत. त्यामुळे फिर्यादी मुलीसह भोसरी येथे राहतात. फिर्यादींची मुलगी सुट्टीसाठी औरंगाबाद येथे काकाकडे गेली होती.

दागिने चोरीला

पिंपरी : घराचे कुलूप तोडून लाकडी कपाटातील एक लाख ५७ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार शुक्रवारी (११ डिसेंबर) वाल्हेकरवाडी येथे घडला. या प्रकरणी नितीन दत्तात्रय खताळ (वय २७, रा. वाल्हेकरवाडी चिंचवड) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी फिर्यादी घराला कुलूप लावून बाहेर गेले असता, अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटाचा दरवाजा तोडून कपटातील १ लाख ५७ हजार रुपयांचे दागिने चोरले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here