नवी दिल्ली:
स्वीडनची दिग्गज रिटेल कंपनी आइकियाने जगभरातील आपल्या स्टोर्समधून लाखो ‘मेड इन इंडिया’ प्लास्टिक मग परत मागवले आहेत. कंपनीने सांगितलं की या मगमध्ये रसायने दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे लक्षात आल्यानंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे. याशिवाय आइकियाने आपल्या ग्राहकांना Troligtvis ट्रॅव्हल मगचा वापर तत्काळ बंद करण्यास सांगितले आहे.

कंपनीने आपल्या वेबसाइटवर लिहिलंय, ‘यासंबंधी कुठली मेडिकल वॉर्निंग जारी केलेली नाही. पण ग्राहकांची सुरक्षितता ध्यानात घेऊन आम्ही हे पाऊल उचललेलं आहे.’ आइकिया इंडियाचे प्रवक्ता म्हणाले, ‘आइकिया रिस्क अँड कम्प्लायन्स टीम या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे आणि ही खबरदारी घेण्यात येत आहे. आमच्या उत्पादनामुळे तब्येतीवर कोणताही विपरित परिणाम होणार नाही.’

या प्रकरणाची माहिती असणाऱ्या एका व्यक्तीनं सांगितलं की आइकियाने आपले मेड इन इंडिया मग्ज पुन्हा मागवले आहेत. आठवडाभरापूर्वी हा निर्णय झाला. या मगमध्ये डिबुटिल फालेटची पातळी जास्त आहे. याचा वापर प्लास्टिसायझरप्रमाणे केला जातो. यामुळे प्लास्टिकचं उत्पादन अधिक फ्लेक्सिबल आणि ड्युरेबल बनतं.

भारतीय बाजारात या मगची किंमत १२९ रुपये प्रति नग आहे. कंपनीने जगभरात हे प्रोडक्ट विक्रीसाठी उपलब्ध केल्यानंतर चार महिन्यांनी हे तथ्य बाहेर आलं. कंपनीने ऑक्टोबर २०१९ पासून हे प्रोडक्ट विकायला सुरुवात केली होती.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here