डुंगरपूर, : स्थानिक निवडणुकांदरम्यान देशव्यापी राजकारणाशी विसंगत असा एक वेगळाच राजस्थानात पाहायला मिळतोय. जिल्हाप्रमुख निवडणुकीत भारतीय ट्रायबल पक्षाच्या (BTP) उमेदवाराला हरवण्यासाठी आणि भाजपनं हात मिळवणी केल्यानंतर याची बरीच चर्चा सुरू आहे. याच मुद्यावर आता एआयएमआयएम अध्यक्ष यांनीही दोन्ही पक्षांवर निशाणा साधलाय.

हैदराबाद महानगरपालिकेत आणि बिहारमध्ये ‘वोटकटवा’ म्हणून टीका सहन करणाऱ्या ओवैसींनी आता आणि काँग्रेसच्या हातमिळवणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. सोबतच, डुंगरपूर निवडणुकीत बीटीपीच खरा किंगमेकर ठरणार असल्याचं म्हणत सत्तास्थापनेसाठी बीटीपीला सहकार्य करण्याची तयारीही ओवैसी यांनी दाखवलीय.

‘वासवाजी काँग्रेस तुम्हाला आणि मला सकाळी-सायंकाळी विरोधी एकतेचे धडे देईल. परंतु, स्वत: मात्र जानवेधारी एकतेपासून पुढे जाणार नाहीत. हे दोघेही एकच आहेत. तुम्ही कधीपर्यंत यांच्या मदतीनं वाटचाल कराल? तुमची स्वतंत्र राजकीय शक्ती किंगमेकरपेक्षा कमी आहे का? आशा आहे की तुम्ही लवकरच एखादा योग्य निर्णय घ्याल. या संघर्षात आम्ही तुमच्यासोबत आहोत’ असं ओवैसी यांनी बीटीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष छोटूभाई वासवा यांच्या एका ट्विटला उत्तर देताना म्हटलंय.

वाचा : वाचा :

या अगोदर, काँग्रेसवर नाराज असलेल्या मुस्लीम नेत्यांकडून ओवैसींना संपर्क करून राजस्थानात पक्ष सक्रीय करण्याचं निमंत्रण देण्यात आलं होतं.

डुंगरपूरमध्ये जिल्हा प्रमुख निवडणुकीत बीटीपीला हरवण्यासाठी एकत्र आलेल्या काँग्रेस आणि भाजपच्या युतीमुळे अनेक राजकीय समीकरणं बदलली आहेत. बीटीपीच्या दोन्ही आमदारांनी राज्यातील काँग्रेस सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची मागणी करण्यात येतेय. याच दरम्यान काँग्रेस आणि बीटीपीच्या वादाचा फटका ओवैसींना पडू शकतो.

वाचा : वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here