वाचा:
सरनाईक यांच्या घरात पाकिस्तानी क्रेडिट कार्ड (Pakistani Credit Card) सापल्याचं वृत्त सर्वत्र प्रसिद्ध झालं होतं. शिवसेनेचा आमदार आणि पाकिस्तानी क्रेडिट कार्ड या कनेक्शनमुळं याची मोठी चर्चा झाली होती. विधिमंडळाच्या अधिवेशनाला हजेरी लावण्यासाठी विधानभवनात आलेल्या सरनाईक यांनी आज पत्रकारांकडे या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केलं. ‘माझ्या घरात पाकिस्तानी क्रेडिट कार्ड मिळालं असं ट्वीट कंगनानं केलं होतं. त्यात अजिबात तथ्य नव्हतं. मात्र, कंगनानं केलेल्या या ट्वीटवरून इलेक्ट्रॉनिक, प्रिंट आणि इंटरनेट मीडियानं याबाबत बातम्या दिल्या. त्यामुळं माझी बदनामी झाली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारे अधिकृतरित्या असं काही जाहीर केलं नव्हतं. माझ्या घरावरील छाप्यातही तसं काही आढळून आलं नव्हतं. असं असतानाही माझी व माझ्या कुटुंबीयांची बदनामी करण्याकरता कंगनानं हे ट्वीट केलं. त्यातून देशभरात माझी बदनामी झाली. त्यामुळं अशा बातम्या देणाऱ्या माध्यमांच्या व कंगनाच्या विरोधात मी दाखल केला आहे,’ असं सरनाईक म्हणाले. ‘भविष्यातही अशा निराधार बातम्या येतच राहतील. काही ना काही बातम्या देऊन माझी बदनामी करण्याचं हे कटकारस्थान आहे. त्यामुळंच हक्कभंगाच्या प्रस्तावाला ताबडतोब मंजुरी द्यावी, अशी मागणी मी विधानसभा अध्यक्षांकडं केली आहे’, असं त्यांनी सांगितलं.
वाचा:
टॉप्स समूहातील कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी सध्या प्रताप सरनाईक व त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी सुरू आहे. त्याबाबत त्यांनी भूमिका मांडली. ‘ईडीच्या चौकशीला मी आणि माझे कुटुंबीय सर्वतोपरी सहकार्य करत आहेत. ज्यावेळी चौकशीची गरज असेल, त्यावेळी एका फोनवर मी दोन तासांत हजर होईन, असं मी स्वत: ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगितलंय. आतापर्यंत मी प्रत्येक प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. भविष्यातही देईन,’ असं ते म्हणाले.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times