सोलापूर: सोलापुरात ६ किलो सोने जप्त करण्यात आले आहे. स्थानिक पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. जप्त केलेल्या सोन्याची अंदाजे किंमत ३ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे सोने विशाखापट्टणमहून मुंबईत रस्तेमार्गे आणले जात होते.

मुंबईत आणण्यात येणारे हे सोने कारमधील चालकाच्या सीटखाली लपवून आणले जात होते. प्रत्येकी एक किलोची ६ सोन्याची बिस्किटे चालकाच्या सीटखाली लपवून ठेवले होते. मात्र, पोलिसांनी मोठ्या शिताफीने ही कारवाई करत सोने जप्त केले आहे. पोलिसांना खबऱ्यांकडून माहिती मिळाली होती. त्यानंतर सापळा रचून सावळेश्वर टोलनाक्याजवळ पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी चालकासह दोन जणांना अटक केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे. हे सोने कुणी दिले होते आणि मुंबईत ते कुणाला देण्यात येणार होते, याची माहिती घेतली जात होती. या कारवाईमुळे सोने तस्करांमध्ये खळबळ माजली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here