मुंबईः मुख्यमंत्री यांच्या वर्षा या शासकिय निवासस्थानाचे पाणी बिल थकित असून पालिकेनं मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यांसह अन्य मंत्र्यांचे बंगले डिफॉल्टर घोषित केल्याचं समोर आलं होतं. या सर्व प्रकरणानंतर मुंबई महानगरपालिकेनं स्पष्टीकरण दिलं आहे.

मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यासह इतर मंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानाकडे पाण्याची एकूण २४ लाख ५६ हजार ४६९ थकबाकी आहे, असा दावा माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी महापालिकेच्या संकेतस्थळावरुन पाण्याच्या थकबाकीदारांची माहिती संकलित केल्यानंतर केला होता. मुंबई महापालिकेनं शकील अहमद शेख यांचा हा दावा खोडून काढला आहे.

वाचाः

मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ या बंगल्याची पाणी बिलापोटी कोणतीही थकबाकी नाही. बृहन्मुंबई महानगरपालिकेकडेने दिलेल्या अहवालानुसार वर्षा आणि तोरणा या दोन्ही बंगल्यांची थकबाकी ‘निरंक’ आहे, असा खुलासा मुंबई महापालिकेनं केला आहे.

वाचाः

मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान म्हणून मलबार हिल येथील ‘वर्षा’ आणि त्याच्याशी संलग्न ‘तोरणा’या बंगल्यांचा समावेश आहे. या बंगल्यांचे पाणी बिल थकीत असल्याच्या वृत्तामध्ये तथ्य नाही. मुंबई महानगरपालिकेच्या जलकामे विभागाच्या कार्यालयाने याबाबत थकबाकी अहवाल दिला आहे. त्यामध्ये या दोन्ही बंगल्यांची थकबाकी निरंक असल्याची वस्तुस्थिती स्पष्ट करण्यात आली आहे, असं मुंबई महापालिकेनं म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?
मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यासह इतर मंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानाकडे पाण्याची एकूण २४ लाख ५६ हजार ४६९ थकबाकी आहे. त्यात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासोबतच मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांचा (तोरणा), उपमुख्यमंत्री अजित पवार (देवगिरी), जलसंपदामंत्री जयंत पाटील (सेवासदन), ऊर्जामंत्री नितीन राऊत (पर्णकुटी), महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (रॉयलस्टोन), विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (सागर), अशोक चव्हाण (मेघदूत) सुभाष देसाई, उद्योगमंत्री (पुरातन), दिलीप वळसे-पाटील (शिवगिरी), सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे (नंदनवन), राजेश टोपे (जेतवन), विधानसभा अध्यक्ष नाना पटोले (चित्रकूट), राजेंद्र शिंगणे (सातपुडा), नवाब मलिक (मुक्तागिरी), छगन भुजबळ (रामटेक), विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर (अजिंठा) आणि सह्याद्री अतिथीगृहाचा समावेश आहे.

वाचाः

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here