मुंबईः आज राज्यात ६० करोना रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला असून २ हजार ९४९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर, राज्याचा रिकव्हरी रेट ९३. ५४ टक्के इतका झाला आहे. ()

राज्यातील करोनाच्या आकडेवारीत मोठा फरबदल होताना दिसत आहे. आज पुन्हा राज्यातील रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. गेल्या सात महिन्यांपासून करोनाच्या विळख्यात सापडला आहे. तर, गेल्या दोन महिन्यांपासून करोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होत असून मोठ्या प्रमाणात दिलासा मिळतोय. करोना रुग्णांचा हा आकडा झपाट्याने खाली येत असल्यामुळं राज्यातील आरोग्य यंत्रणांच्या प्रयत्नांनाही यश येत असल्याचं चित्र आहे. आजही करोनामुक्त रुग्णांच्या संख्या करोनाबाधित रुग्णांपेक्षा जास्त आहे. तसंच, राज्यात अॅक्टिव्ह रुग्णही कमी होत आहे.

वाचाः

आज राज्यात ४ हजार ६१० रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर, २ हजार ९४९ नवे करोना बाधित रुग्ण सापडले आहेत. राज्यातील करोनामुक्त रुग्णांची संख्या आता १७ लाख ६१ हजार ६१५पर्यंत झाली आहे. त्यामुळं राज्यातील रुग्णवाढीचा टक्का काही प्रमाणात वाढत आहे. आजही राज्याचा रिकव्हरी रेट ९३. ५४ टक्के इतका झाला आहे.

वाचाः

राज्यात आज ६० करोना बाधित रुग्ण दगावले आहेत. त्यामुळं राज्यातील एकूण करोना मृतांचा आकडा ४८ हजार २६९ इतका झाला आहे. राज्यात करोना मृतांचा आकडा नियंत्रणात येत असताना अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही कमी होताना दिसत आहे. सध्या राज्यात ७२ हजार ३८३ अॅक्टिव्ह रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.

वाचाः

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी १७ लाख ४८ हजार ३६२ चाचण्यांपैकी १८ लाख ८३ हजार ३६५ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ४ हजार ४०६ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर, ४ हजार ३३५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here