हेडन म्हणाला की, ” सध्याच्या जमाला हा फटकेबाजीचा आहे. मोठे-मोठे फटके चाहत्यांना पाहायला आवडतात. पण भारताचा तंत्रशुद्ध फलंदाज चेतेश्वर पुजारा हा आक्रमक फलंदाजी करत नसला तरी ऑस्ट्रेलियासाठी डोकेदुखी ठरू शकतो. पुजाराचा फलंदाजी करताना ४५ एवढाच स्ट्राइक रेट आहे. पण तो ज्यापद्धतीने फलंदाजी करतो, ते पाहता ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीपुढे तो मोठे आव्हान नक्कीच उभे करू शकतो.”
भारतीय संघ २०१८-१९ साली ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका खेळला होता. या कसोटी मालिकेत पुजाराने ५२१ धावा केल्या होत्या आणि तोच मालिकावीरही ठरला होता. त्यामुळे आता या मालिकेत पुजारा कशी फलंदाजी करतो, याकडे सर्वांचेच लक्ष असेल. पुजाराने आतापर्यंत ७७ कसोटी सामन्यांमध्ये १८ शतकांच्या मदतीने ५८४० धावा केल्या आहेत.
गावस्कर यांनी यावेळी पुजाराबाबत सांगितले की, ” पुजारा गेल्या काही दिवसांमध्ये क्रिकेट खेळलेला नाही. पण या गोष्टीचा पुजारावर कोणताही परीणाम होणार नाही, असे मला तरी वाटते. पुजारा हा एक चांगला फलंदाज आहे. त्यामुळे त्याची फलंदाजी पाहायलाा मजा येते. त्यामुळे पुजाराने जास्तीत जास्त काळ फलंदाजी करावी, असे मला तरी वाटते.”
कसोटी मालिका१) पहिली कसोटी- १७ ते २१ डिसेंबर, एडिलेड ओव्हल- डे/नाईट (सकाळी ९ वाजता)
२) दुसरी कसोटी- २६ ते ३० डिसेंबर, मेलबर्न (पहाटे ५ वाजता)
३) तिसरी कसोटी- ७ ते ११ जानेवारी २०२१, सिडनी (पहाटे ५ वाजता)
४) चौथी कसोटी- १५ ते १९ जानेवारी, २०२१, गाबा (पहाटे साडे पाच वाजता)
भारताच्या या दौऱ्यातील सर्व सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण सोनी सिक्स आणि डीडी स्पोट्स वर होणार आहे. या शिवाय Sony LIVवर लाइव्ह स्ट्रीमिंग होईल. कसोटी मालिका फक्त सोनी सिक्स आणि Sony LIV वर दिसेल. या शिवाय भारतीय संघ दोन सराव सामने खेळणार आहे. या सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अॅपवर केले जाणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या लढतीचे LIVE UPDATE आणि स्कोअरकार्ड महाराष्ट्र टाइम्सच्या वेबसाइटवर तुम्ही पाहू शकता.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times