नवी दिल्ली : करोनाकाळातही नव्या कृषी कायद्याविरोधात हरयाणा आणि पंजाबचे शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांविरोधात ‘बळाचा वापर’ करण्याच्या भाजप सरकारचा निषेध करत आपले पुरस्कार परत करण्याचा निर्णय या खेळाडूंनी घेतला आहे. पण भारताची महिला कुस्तीपटू आणि भाजपाची नेता बबिता फोगटने यावेळी एक वादग्रस्त वक्तव्य केल्याचे पाहायला मिळत आहे. बबिताने याबाबत एक ट्विट केले असून ते चांगलेच व्हायरल झालेले पाहायला मिळत आहे.

यावेळी बबिता म्हणाली की, ” मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करते की, त्यांना आपल्या घरी परत जावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीही किसान बांधवांचे हक्क कमी करणार नाहीत. काँग्रेस आणि वामपंथी कधीही शेतकऱ्यांचे भले करू शकत नाही. आता मला वाटत आहे की, हे टुकडे टुकडे गँगने हायजॅक केलेले आहे.” बबिताने यावेळी आपल्या ट्विटमधून काँग्रेसवर टीका करण्याची संधी सोडलेली नाही, त्याचबरोबर तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थन केले आहे. त्यामुळे काही जणांनी बबितावर सडकून टीकाही केली आहे.

शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला दिवसेंदिवस क्रीडा क्षेत्रातूनही चांगलाच पाठिंबा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. पण बबिताने मात्र शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिल्याचे पाहायला मिळत नाही. बबिताने यावेळी मोदी यांची बाजू लावून धरली असून शेतकऱ्यांनाच हे आंदोलन मागे घ्यायला सांगत आहे. त्यामुळे बबिताबाबत राग सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. काही जणांनी यावेळी बबिताला चांगलेच ट्रोलही केले आहे.

पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार सन्मानित अनेक माजी खेळाडूंनी कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचं समर्थन केले आहे. केंद्र सरकारनं नवीन कृषी कायदा रद्द करावा किंवा किमान हमीभावाची तरतुदी कायद्यात करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. त्यामुळे सरकारच्या विरोधानंतर हे आंदोनल चिघळलेले आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आता क्रीडापटूही पुढे सरसावलेले पाहायला मिळत आहेत. पण बबिता मात्र या आंदोलनाला पाठिंबा देत नसल्याचेच पाहायला मिळत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here