झाल्यानंतरही पूर्ववत होण्यासाठी किती कालावधी लागतो, असा प्रश्न रुग्णांकडून तसेच त्यांच्या कुटुंबीयांकडून पुन्हा-पुन्हा विचारला जातो. मात्र करोनामुक्त झाल्यानंतरही ‘लॉग कोव्हिड’ या प्रक्रियेमध्ये पूर्ववत बरे होण्यासाठी तीन ते सहा महिन्यांचा कालावधी लागत असल्याचे करोनामुक्त झालेल्या व्यक्तीच्या वैद्यकीय अभ्यासातून दिसत आहे. आयसीयूतज्ज्ञ डॉ. राहुल पंडित यांनी नोंदवलेल्या वैद्यकीय अभ्यासामध्ये वीस टक्के रुग्णांना करोनामुक्त झाल्यानंतरही निद्रानाशाचा त्रास होत असल्याचे दिसून आले आहे.
करोनामुक्त झाल्यानंतर रुग्णांना पूर्ववत होण्यास तीन ते सहा महिने वेळ लागतो. चिडचिड, नैराश्य, अस्वस्थता, भीती वाटणे, हृदयाचे ठोके वाढणे अशी लक्षणे अनेक रुग्णांमध्ये होऊन गेल्यानंतर दिसून येत आहेत. या रुग्णांना अतिदक्षता विभागामध्ये राहण्याचीही गरज नसते. सौम्य करोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांना करोनामुक्त झाल्यानंतरही घरी गेल्यानंतरही धाप लागणे, हाडाची दुखणी, श्रवणक्षमतेवर परिणाम होणे, सर्दी खोकला, चव व वास न येणे, पायऱ्या चढल्यानंतरही धाप लागण्याचा त्रास भेडसावतो. तीस टक्के व्यक्तीमध्ये दम लागणे, श्वास घ्यायला त्रास हाेतो.
यासंदर्भात डॉ. राहुल पंडित यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी पाश्चात्य देशाच्या तुलनेमध्ये करोनामुक्त होऊन घरी गेलेले आपल्या येथील रुग्ण वैद्यकीय उपचार घेण्यासाठी त्वरित येत नाही. ते दहा ते पंधरा दिवस प्रतीक्षा करतात. लक्षणे नियंत्रणात येत नसतील तेव्हाच हे रुग्ण वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी येतात. त्यांना दीर्घकाळ उपचारांची गरज असलेले करोनारुग्ण असे संबोधले जाते. तर दुसऱ्या गटातील रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देता येत नाही. त्यांची ऑक्सिजनची पातळी स्थिर होत नसल्याने त्यांना रुग्णालयामध्येच ठेवावे लागते. करोना रुग्णांच्या अभ्यासामध्ये अनेक रुग्ण अंग गरम लागणे मात्र ताप नसणे, अंगदुखी, धाप लागणे, उत्साह न वाटणे, डोकेदुखी अशा तक्रारींही नोंदवतात. खूप प्रयत्न करूनही झोप येत नाही, विचार वा ताण नसला तरीही झोपेसाठी तळमळत राहावे लागते अशा तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांना योगासने, हलक्या स्वरूपाचा व्यायाम, पोषक आहार घेण्याचा वैद्यकीय सल्लाही आवर्जून दिला जातो.
‘विश्रांती घ्या’
करोनामुक्त होण्याचा नेमका टप्पा केव्हा येतो हे सांगणे कठीण असल्याचे वैद्यकीय निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवले आहे. करोनामुक्त झाल्यानंतर किंवा रुग्णालयातून घरी आल्यावर लगेच पूर्वीप्रमाणे दिनक्रम सुरू करता येईल अशी अपेक्षा करू नका, असा सल्ला डॉ. पंडित यांनी दिला आहे. दोन कामांच्यामध्ये विसावा घेणे, थोडा वेळ विश्रांती घेत पुढील कामाचा टप्पा गाठणेही महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times