नवी दिल्ली : देशातील आठ बड्या बँकांच्या जाणीवपूर्वक थकवलेल्या कर्जांमध्ये (विलफुल डिफॉल्ट) चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत (एप्रिल ते सप्टेंबर २०२०) मोठी वाढ झाली आहे. ट्रान्सयुनियन सिबिलच्या आकडेवारीनुसार एप्रिल ते सप्टेंबरदरम्यान या कर्जांमध्ये ३७ हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे देशातील एकूण थकीत कर्जे दीड लाख कोटी रुपयांच्या घरात गेली आहेत.

सर्वाधिक थकीत कर्जे असणाऱ्या बँकांमध्ये स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि अॅक्सिस बँकेचा समावेश आहे. ३० सप्टेंबर २०२०पर्यंत एकूण थकीत कर्जांपैकी ७५ टक्के कर्जे य़ाच आठ बँकांची आहेत. वर्षभरापूर्वी याच कालावधीमध्ये थकीत कर्जांच्या एकूण रकमेत १० हजार कोटी रुपयांची वाढ झाली होती. एक एप्रिलला काही सरकारी बँकांचे विलीनीकरण करण्यात आले. त्यामुळे बँकांच्या नोंदविण्यात आली.

पंजाब नॅशनल बँकेमध्ये ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडियाचे विलीनीकरण झाले. यावर्षी मार्चमध्ये ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, युनायटेड बँक ऑफ इंडिया, आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँक आदी छोट्या बँकांची २१,८३७ कोटी रुपयांची कर्जे थकीत होती. … सरकारी बँकांचे योगदान अधिक वार्षिक आधारावर आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँकेच्या जाणीवपूर्वक थकीत कर्जांमध्ये अनुक्रमे ०.२ टक्के आणि ०.८ टक्क्यांची घसरण नोंदविण्यात आली आहे.

पहिल्या सहामाहीतील थकीत कर्जांमध्ये सरकारी बँकांचे योगदान अधिक असल्याचे दिसून आले आहे. कर्ज फेडण्याची क्षमता असूनही जाणीवपूर्वक थकवलेल्या कर्जांना विलफुल डिफॉल्ट असे म्हटले जाते. ज्यांच्या नावावर हे कर्ज असते, त्यांना सहेतुक कर्जबुडवे असे म्हटले जाते. ग्राहकाने ज्या कारणासाठी कर्जाची मागणी केली आहे, त्यासाठी न वापरता भलत्याच कारणासाठी विनियोग केला असेल तरी त्याला सहेतुक कर्जबुडवे असे संबोधले जाते.


थकीत कर्जे वाढण्याची कारणे – करोनाच्या संक्रणाच्या आधाही सहेतूक कर्जबुडव्यांची संख्या वाढली आहे.

– मात्र, एप्रिलनंतर त्यामध्येही वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

– करोनाकाळात केंद्र सरकारने दिवाळखोरी प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत नवे दाखल करण्यास मनाई केली.

– थकीत कर्जांवर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्राने २०१९मध्ये सर्व बँकांना पन्नास कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची कर्जखाती थकीत आहेत, का हे पाहण्याची सूचना केली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here