मॉस्को: जगभरात करोनाचे थैमान सुरू असून काही देशांमध्ये करोनाची दुसरी, तिसरी लाटही आली आहे. करोनाला अटकाक करण्यासाठी लस विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही लशींची चाचणी अंतिम टप्प्यात असून काहींना आपल्या चाचणीचे परिणाम, निष्कर्ष जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. करोनाने गंभीर आजारी असलेल्या बाधितांवर रशियाची स्पुटनिक व्ही लस १०० टक्के प्रभावी ठरणार असल्याचे चाचणी आढळून आले आहे.

स्पुटनिक व्ही लशीच्या चाचणीचे परिणाम, निष्कर्ष जाहीर करण्यात आले. ही लस विकसित करणाऱ्या गोमालिया नॅशनल रिसर्च सेंटर फॉर एपिडीमियॉलजी अॅण्ड मायक्रोबायलॉजीने केलेल्या दाव्यानुसार करोनाने गंभीर आजारी असलेल्या रुग्णांवर ही लस १०० टक्के प्रभावी ठरली आहे. तर, करोनाच्या विरुद्ध ही लस ९१.५ टक्के प्रभावी आहे. लस चाचणी डेटातून उपलब्ध माहितीच्या विश्लेषणातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. लस चाचणीच्या पहिल्या कंट्रोल पॉईंटमध्ये लस ९२ टक्के प्रभावी आढळून आली होती. तर, दुसऱ्या कंट्रोल पॉईंटमध्ये ९१.४ टक्के प्रभावी असल्याचे समोर आले होते.

वाचा:

लस चाचणीची माहिती, संशोधन लवकरच वैद्यकीय नियतकालिकेत प्रकाशित केला जाणार आहे. त्यानंतर जगभरातील देशांमध्ये स्पुटनिक व्ही लशीच्या नोंदणीसाठी एक अहवाल तयार करण्यात येणार आहे. जेणेकरून संबंधित देशांमध्ये लस वापरास परवानगी मिळवण्याची प्रक्रिया सुरू करता येणार आहे. भारतामध्ये या लशीची मानवी चाचणी सुरू आहे. डॉ. रेडीज् लॅबोटरीजच्या माध्यमातून ही लस चाचणी घेण्यात येत आहे.

वाचा:

लस कशी काम करते ?
‘स्पुटनिक व्ही’ लस ही सामान्यत: सर्दी निर्माण करणाऱ्या adenovirus या विषाणूवर आधारीत आहे. या लशीची निर्मिती आर्टिफिशल पद्धतीने करण्यात आली आहे. करोनाचा विषाणू SARS-CoV-2 मध्ये आढळणाऱ्या स्ट्रक्चरल प्रोटीनची नक्कल करते. त्यामुळे शरीरात एक रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते.

वाचा:
स्वस्त असणार ‘स्पुटनिक व्ही’ लस

‘स्पुटनिक व्ही’ या लशीची किंमत मॉडर्ना, फायजरच्या लशीपेक्षा स्वस्त असणार आहे. ही लस रशियात नागरिकांसाठी मोफत उपलब्ध असणार आहे. तर, इतर देशांमध्ये या लशीचा एक डोस १० डॉलरपेक्षाही (७४० रुपये) कमी किंमतीत उपलब्ध होणार आहे. फायजरची किंमत ही प्रति डोस १९.५० डॉलर (१४४६.१७ रुपये) आणि मॉडर्नाची किंमत २५ ते ३७ डॉलर (१८५४ ते २७४४ रुपये) इतकी असणार आहे. त्यामुळे प्रति व्यक्ती ३९ डॉलर आणि ५० ते ७४ डॉलर इतकी लशीची किंमत असणार आहे. फायजर, मॉडर्ना आणि स्पुटनिक व्ही या लशींच्या दोन डोसची आवश्यकता असणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here