बंगळूरमध्ये संजनाला धर्मांतर करण्यास भाग पाडल्याची तक्रार एका वकिलाने केली आहे. अमृतेश नावाच्या वकिलाने मौलवीविरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीनुसार, संजनाने ९ ऑक्टोबर २०१८ रोजी हिंदू धर्म सोडला आणि धर्म स्वीकारला आणि आपले नाव बदलून माहिरा केलं.
तक्रारीत पुढे लिहिले की, पुराव्यासाठी संजनाचं नाव बदललेलं प्रमाणपत्रही तयार करण्यात आलं. एफआयआरमध्ये अभिनेत्रीच्या इच्छेविरूद्ध तिचं इस्लाम धर्मात रूपांतर केलं असल्याचं रिपोर्टमध्ये लिहिलं. पोलिसांनी यासंदर्भात कायदेशीर मत मागितलं असून कार्यवाही पुढे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
काही दिवसांपूर्वी अजीज नावाच्या व्यक्तीसोबत संजनाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या दोघांनी लग्न केल्याचं म्हटलं जात आहे. यासोबतच दारुल उलूम शाह वलीउल्लामध्ये असलेल्या दस्तावेजानुसार संजनाने धर्मांतर करून इस्लाम धर्म स्वीकारल्याचं म्हटलं गेलं आहे.
Ganda Hendathi या सिनेमातून २००६ मध्ये संजनानाने कन्नड सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. यानंतर संजनाने बर्याच सिनेमांत काम केलं. अभिनेत्रीने तेलगू आणि मल्याळम सिनेमांमध्येही काम केलं आहे. संजना कलर्सच्या रिअॅलिटी शो ‘मुझसे शादी करोगे’ मध्येही दिसली होती. या शोमध्ये ती पारस छाब्राची बायको होण्यासाठी पोहोचली होती.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times