वाचा:
पुरवणी मागण्यांवरील चर्चेत () ते बोलत होते. राज्यात आणीबाणीसारखी परिस्थिती असल्याचा पुनरुच्चार फडणवीस यांनी केला. त्यासाठी त्यांनी गोस्वामी व कंगना प्रकरणाचा दाखला दिला. ‘अर्णव गोस्वामी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्याबद्दल जी वक्तव्ये केली, ती चुकीचीच आहेत. मी त्याचा निषेधच करतो. त्यांना असं बोलण्याचा अधिकार नाही. याच अर्णव गोस्वामी यांनी माझ्याही विरोधात ‘मीडिया ट्रायल’ चालवली होती. तीनदा चालवली होती. एकदा अमेरिकेत असताना माझ्या मागे कॅमेरे लावण्यात आले होते. मी तिथं गुंतवणूकदारांची भेट घेत होतो आणि ह्यांचे कॅमेरे वेगळंच काम करत होते. पण म्हणून भारतात आल्यानंतर मी त्यांना जेलमध्ये टाकलं नाही. त्यांना उत्तर दिलं. हा फरक आहे,’ असं फडणवीस म्हणाले.
वाचा:
अभिनेत्री कंगना राणावत हिच्या प्रकरणातील सरकारच्या भूमिकेलाही फडणवीसांनी आक्षेप घेतला. ‘खून केला त्याला फाशी दिलीच पाहिजे, चोरी केली शिक्षा झालीच पाहिजे. पण इथं कायद्याचं राज्य आहे. तुम्ही अब्रुनुकसानीचा खटला दाखल करू शकता. पण, मनात आलं म्हणून तुम्ही कोणाचं घर तोडू शकत नाही. हे पाकिस्तान नाही,’ असं फडणवीस यांनी सुनावलं. ‘सत्ता ही डोक्यात जाता कामा नये. राज्य कारभार कितीही काळ चालवा. २५ वर्षे चालवा. २७ वर्षे चालवा, पण कायद्यानं चालवा,’ असा चिमटाही त्यांनी काढला.
वाचा:
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times