मुंबईः हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा व शेवटचा दिवस असून आज सभागृहात विविध मुद्द्यांवरुन भाजपनं ठाकरे सरकारला घेरलं आहे. विरोधी पक्ष नेते यांनीही वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यांवर सरकारवर हल्ला चढवला आहे. वीज बिलांबाबत सरकारने जनतेची फसवणूक केली आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला आहे. शिवाय, विधानसभा अध्यक्ष यांनीही वाढीव वीज बिल बंद करा, असे आदेश सरकारला दिले आहे.

महाविकास आघाडीत विसंवाद नाही असं मुख्यमंत्री म्हणतात पण, विजबिलांच्या सवलतीचे काय झालं? मुख्यमंत्र्यांनी विज बिलासंदर्भात मौन धारण केलं, एक अक्षरही बोलले नाहीत हा कसला संवाद? असे अनेक प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केले आहेत.

विज बिलांबाबत माझं काही म्हणणं नाही पण जी वीज वापरलीच नाही त्याचं बिल कसं भरणार? आम्ही मोफत वीज देणार ही घोषणा उर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्वतःहून केली होती, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

या चर्चेदरम्यान, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनीही वाढीव वीज बिलांबाबत राज्य सरकारला सूचना दिल्या आहेत. मंत्री महोदय विरोधी पक्षनेते जी भूमिका मांडत आहेत, महाराष्ट्रात वाढीव वीज बिल देण्याची जी पद्धत आहे, ती तातडीने थांबवली पाहिजे, अशा सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्या आहेत.

एखाद्याचं घर नाही, मिटर नाही त्यांनाही बिलं पाठवली जातात, हे थांबवलं पाहिजे, असं म्हणण पटोले यांनी मांडलं. तसंच, या पूर्वीच्या सरकारपासूनही तेच सुरु आहे आणि आत्ताच्या सरकारमध्येही तेच. त्यामुळं हा राजकारणाचा विषय नसून वाढीव वीज बिलं देणं सरकारनं थांबवलं पाहिजे, असंही त्यांनी नमूद केलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here