म. टा. प्रतिनिधी, : दोन लहान मुलींसह महिलेने विहिरीत उडी मारून केली. शिरोळ तालुक्यातील जांभळीत ही हृदयद्रावक घटना घडली आहे. ही घटना सोमवारी संध्याकाळी घडली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सुप्रिया शिवाजी भोसले (वय २४), मृण्मयी (वय ५) आणि मृणाली (वय ४) अशी मृत मायलेकींची नावे आहेत. या घटनेमुळे परिसर आणि गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुप्रिया सोमवारी दुपारी शाळेत जात असल्याचे सांगून दोन्ही मुलींसह घराबाहेर पडली होती. संध्याकाळपर्यंत घरी न परतल्याने तिच्या पतीने नातेवाईक आणि गावात सर्वत्र चौकशी केली. पण कुठेही ती सापडली नाही.

अखेर सुप्रियाच्या पतीने पोलिसांत धाव घेतली. पिराचा माळ या भागात ती गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले. त्यामुळे या भागात पाहणी केल्यानंतर एका मुलीचा मृतदेह विहिरीत तरंगताना दिसून आला. तिने दोन्ही मुलींसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याचे उघड झाले. पाच वर्षांपूर्वीच तिचा प्रेमविवाह झाला होता. तिच्या आत्महत्येचे कारण अजून स्पष्ट झाले नाही. बचाव पथकाला पाचारण करण्यात आले असून, इतर दोघींच्या मृतदेहांचा शोध घेतला जात आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here